‘3 Idiots’चा चतुर आठवतो? ओमी वैद्यचा बदलला लुक; फॅन्स म्हणाले, हे चमत्कारी पुरूष...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:25 PM2022-12-30T16:25:05+5:302022-12-30T16:26:06+5:30

3 Idiots, Omi Vaidya : ओमी वैद्य प्रचंड बदलला आहे. त्याचे काही नवे फोटो पाहून हाच तो चतुर यावर तुमचाही विश्वास बसणार नाही....

3 idiots chatur aka omi vaidya looks different now actor latest photo viral | ‘3 Idiots’चा चतुर आठवतो? ओमी वैद्यचा बदलला लुक; फॅन्स म्हणाले, हे चमत्कारी पुरूष...

‘3 Idiots’चा चतुर आठवतो? ओमी वैद्यचा बदलला लुक; फॅन्स म्हणाले, हे चमत्कारी पुरूष...

googlenewsNext

‘3 इडियट्स’ (3 Idiots) हा बॉलिवूडचा यादगार सिनेमा. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की, चॅनल बदललं जात नाही. या सिनेमातील सगळीच पात्र गाजली. पण सर्वाधिक गाजला तो चतुर. होय, ‘3 इडियट्स’ चित्रपटातील चतुर तुम्हाला आठवत असेल. सतत रँचोचा तिरस्कार करणं आणि अभ्यासू असलेल्या चतुरने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.आपल्या हटके शैलीमुळे या चतुरने प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलं होतं. त्याच्या भाषणाचा सिनेमातला एक सीन तर तुफान गाजला.  चतुर ही भूमिका अभिनेता ओमी वैद्यने (Omi Vaidya) साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष झाली. मात्र, चतुरला अजूनही कोणी विसरलेलं नाही. त्यामुळेच हा अभिनेता काय करतो, कसा दिसतो हा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. तर आता ओमी वैद्य प्रचंड बदलला आहे. त्याचे काही नवे फोटो पाहून हाच तो चतुर यावर तुमचाही विश्वास बसणार नाही.

या फोटोत ओमी वैद्य अगदीच स्टायलिश अंदाजात दिसतो आहे. काही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोत त्याचा स्वॅग पाहायला मिळतो. खरं तर ओमीचे हे फोटो तसे काही महिने जुने आहेत. पण सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी मजेशीर कमेंट्सही देत आहेत.

चित्रपटात वेंधळट वाटणारा चतुर रिअल लाईफमध्ये प्रचंड वेगळा आणि स्मार्ट आहे. ओमी वैद्यच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हे चमत्कारी पुरूष कहां थे आप, असं एका युजरने लिहिलं आहे. ज्याने झूम कॉल वर 900 कर्मचाऱ्यांना फायर केलं, तू अगदी त्या सीईओसारखा दिसतोय, असं अन्य एका युजरने लिहिलं आहे. 

Web Title: 3 idiots chatur aka omi vaidya looks different now actor latest photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.