१७ वर्षांची झाली आलिया; तिच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे डॅडी अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 16:26 IST2018-01-09T10:53:53+5:302018-01-09T16:26:16+5:30

अनुराग कश्यपची मुलगी आलिया १७ वर्षांची झाली असून, तिने तिचा वाढदिवस नुकताच सेलिब्रेट केला आहे. अनुरागची गर्लफ्रेंड मुलगी आलियापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे.

17 years old; Daddy Anurag Kashyap's girlfriend is seven years older than her! | १७ वर्षांची झाली आलिया; तिच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे डॅडी अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड!

१७ वर्षांची झाली आलिया; तिच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे डॅडी अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड!

ॅँग्स आॅफ वासेपूर, देव डी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट दिग्दर्शन करणाºया अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप १७ वर्षांची झाली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनुरागने मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर आलियाला सल्ला देताना त्याने फोटोसोबत इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘आलियाला १७ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आता वेळ आली आहे की, तू तुझ्या वयाप्रमाणे वागायला शिक.’ यावेळी आलियानेदेखील तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 
 

बी-टाउनमध्ये पॉप्युलर स्टार डॉटर्स म्हणून आलियाला ओळखले जाते. इन्स्टाग्रामवर तर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे अकाउंट स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. आलिया रणबीर कपूरची मोठी चाहती आहे. आलियाने एका फॅशन पोर्टलला मॉडलिंगही केले आहे. सध्या आलिया अमेरिकेतील एका स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी खुशी कपूर आणि आलिया खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर खुशीसोबत अनेक फोटोज् शेअर केले आहेत. आलिया तिच्या इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हलिंग, पार्टी आणि तिच्या मित्रांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करीत असते. फोटोवरून आलिया एक स्टार मटेरिअल आहे, हे स्पष्ट होते. 
 

दरम्यान, २००३ मध्ये अनुराग कश्यप याने फिल्म एडिटर आरती बजाज हिच्याशी लग्न केले होते. पुढे सहा वर्षांनंतर २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी अनुराग अभिनेत्री कल्की कोचलिन हिला डेट करीत होता. त्यामुळेच कल्की अनुरागच्या बºयाचशा चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली. पुढे या दोघांनी २०११ मध्ये लग्नही केले. कल्कीने अनुरागच्या ‘देव डी’ या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. दोघांनी चार वर्ष संसार केला. गेल्या दोन वर्षांपासून अनुराग त्याच्या कथित गर्लफ्रेंड शुभ्रामुळे चर्चेत आहे. शुभ्रा २४ वर्षांची असून, अनुरागच्या पहिल्या पत्नीची (आरती बजाज) मुलगी आलिया हिच्यापेक्षा केवळ सात वर्षांनी मोठी आहे. 

Web Title: 17 years old; Daddy Anurag Kashyap's girlfriend is seven years older than her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.