17 वर्षांनंतर सैफ अली खान- माधवन येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 10:20 IST2018-01-24T04:50:50+5:302018-01-24T10:20:50+5:30
'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आर माधवनला एक वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली होती. या चित्रपटामुळे ...
.jpg)
17 वर्षांनंतर सैफ अली खान- माधवन येणार एकत्र
' ;रहना है तेरे दिल में' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आर माधवनला एक वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली होती. या चित्रपटामुळे त्याच्या एक फॅनक्लब तयार झाला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी हिट झाली होती. माधवन नावाचा नवा स्टार बॉलिवूडला या चित्रपटाने मिळवून दिला होता. 'रहना है तेरे दिल में'मध्ये त्याच्यासोबत सैफ अली खानसुद्धा होता. तब्बल 17 वर्षानंतर सैफ आणि माधवन पुन्हा एका मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. दोघांना एवढ्या मोठ्या काळानंतर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.
दिग्दर्शक नवदीप सिंग एक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट तयार करणार आहेत. ज्यात सैफ अली खान आणि आर माधवन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. राजस्थान, मुंबई आणि उत्तर प्रदेशामध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे.
हा चित्रपट राजस्थानमधील कथेवर आधारित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटासाठी सैफ अली खान आणि माधवनच्या लूकवर काम चालू आहे. गेल्या आठवड्यात या दोघांचा लूक फायनल करण्यात आला. कदाचित याच चित्रपटासाठी सैफ हरियाणामध्ये घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतो आहे.
सैफचा नुकताच रिलीज झालेला कालाकांडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. कालाकांडी’ही सैफच्या करिअरसाठी डिजास्टर सिद्ध झाला. या चित्रपटाने चार दिवसांत केवळ 3.40 कोटी कमावले. आमिर खाने ‘कालाकांडी’तील सैफच्या अभिनयाची तोंडभरून स्तूती केली होती. याऊपरही त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना भावला नाही. 2016 मध्ये आलेल्या साला खडूसनंतर आर माधवन चित्रपटात दिसलाच नाही आहे. यानंतर तो ऐश्वर्या राय बच्चनच्या 'फन्ने खां' मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र माधवनने जास्त मानधन मागितल्यामुळे निर्मात्यांनी त्याच्या जागी राजकुमार रावची निवड केली आणि माधवन या चित्रपटातून आऊट झाला. त्यामुळे माधवनचे फॅन्स काहीसे नाराज झाले होते.