17 Years of 'कोई मिल गया' सिनेमात जादू भूमिका साकारली होती या कलाकाराने ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 20:00 IST2020-03-01T20:00:00+5:302020-03-01T20:00:00+5:30
‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या सिनेमात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावरील सुपरहिट ठरलेली 'बालवीर' या मालिकेत त्यांनी ''डुबा डुबा'' हे पात्र साकारले होते.

17 Years of 'कोई मिल गया' सिनेमात जादू भूमिका साकारली होती या कलाकाराने ?
'कोई मिल गया' सिनेमा आठवला की सगळ्यात आधी आठवतो तो जादू, हृतिक रोशनप्रमाणे जादूची आजही रसिकांच्या मनात जादू कायम आहे. इतर भूमिकांप्रमाणे जादूनेही रसिकांच्या मनात घर केले आणि आजही ते कायम आहे. मात्र जादू ही भूमिका कोणी साकारली याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. जादू ही भूमिका साकारणारा अभिनेता होता इंद्रवदन पुरोहित.
दूसऱ्या ग्रहावरून आलेल्या या एलियन आणि रोहितच्या मैत्रीमुळे चित्रपटाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर धरले. चित्रपटाच्या रिलीजनंतर जादूची एवढी क्रेज वाढली की मार्केटमध्ये जादूच्या खेळणी, सोबतच स्कूल बॅग्ज, स्टेनशरी आयटम्सवरही जादूच दिसू लागला. सिनेमा पाहिल्यानंतर आपण सर्वांनी जादू नावाच्या या कॅरेक्टरला खरा एलियन ठरवून बसलो.
इंद्रवदन आता या जगात नाहीत. 28 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा मृत्यू झाला. जादू भूमिकेसाठी निर्मात्यांनीही विशेष मेहनत घेतली होती. कुठेही कमी राहू नये यासाठी खूप मेहनतही घेतली गेली. विशेष म्हणजे जादू या भूमिकेचा कॉस्ट्यूम ऑस्ट्रेलियातून बनवण्यात आला होता. इंद्रवदन पुरोहित यांनी बॉलीवूडमध्ये नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या सिनेमात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावरील सुपरहिट ठरलेली 'बालवीर' या मालिकेत त्यांनी ''डुबा डुबा'' हे पात्र साकारले होते. इंद्रवन यांनी हिंदी, गुजराती, मराठी भाषेत जवळपास 30 सिनेमात काम केले आहे.