...म्हणून विक्रांत मेस्सी तासन् तास उन्हात थांबला, '12th फेल'च्या शूटिंगवेळी अक्षरशः जळाली त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:25 IST2024-03-05T11:25:10+5:302024-03-05T11:25:10+5:30

विक्रांतने एका मुलाखतीत '12th फेल' सिनेमाच्या शुटींगचा थरारक अनुभव सांगितला आहे

12th fail Vikrant Massy in the sun for hours to see the shadow vidhu vinod chopra | ...म्हणून विक्रांत मेस्सी तासन् तास उन्हात थांबला, '12th फेल'च्या शूटिंगवेळी अक्षरशः जळाली त्वचा

...म्हणून विक्रांत मेस्सी तासन् तास उन्हात थांबला, '12th फेल'च्या शूटिंगवेळी अक्षरशः जळाली त्वचा

'12th फेल' सिनेमा २०२३ मध्ये चांगलाच गाजला. विक्रांत मेस्सीच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं. विक्रांतने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत सर्वांनी पाहिली. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला '12th फेल' प्रेरणादायी सिनेमा म्हणून नावाजला गेला. विक्रांतने या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली याचं एक उदाहरण नुकतंच समोर आलंय. स्वतः विक्रांतने याचा खुलासा केलाय.

विक्रांत मेस्सी म्हणाला, "मला वजन कमी करायचे होते आणि माझी त्वचा सावळी करायची होती. मी यासाठी तासन् तास उन्हात उभे होतो. यावेळी टॅनिंग करताना माझी त्वचा जळाली. मग मी खूप घाबरलो. मला वाटलं की आपल्याला शूटिंग पुढे ढकलावं लागेल, पण नंतर मी विधू विनोद चोप्रा यांना सांगितले आणि ते म्हणाले की हा आशीर्वाद आहे. आता आपल्याला मेकअपची अजिबात गरज भासणार नाही. नंतर आम्ही शुटींगला सुरुवात केली."

विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' ने लोकांच्या मनावर राज्य तर केलेच पण बॉक्स ऑफिसमध्येही प्रचंड कमाई केली. बॉलिवूड हंगामानुसार, '12th फेल'ने भारतात 56.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. जगभरात या चित्रपटाची एकूण कमाई 69.64 कोटी रुपये होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सिनेमात विक्रांत सोबतच अनंत जोशी, आयुष्मान पुष्कर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. 

Web Title: 12th fail Vikrant Massy in the sun for hours to see the shadow vidhu vinod chopra