'12th Fail' फेम अभिनेता झाला बाबा, विक्रांत मेसीच्या घरी चिमुकल्याचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 08:38 IST2024-02-08T08:37:26+5:302024-02-08T08:38:06+5:30
विक्रांत मेसीने आणखी एक खुशखबर दिली आहे. विक्रांत मेसी नुकताच बाबा झाला आहे.

'12th Fail' फेम अभिनेता झाला बाबा, विक्रांत मेसीच्या घरी चिमुकल्याचं आगमन
२०२३मधील सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे'12th Fail'. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिस तर गाजवलंच पण ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची लोकप्रियता अधिक वाढली आहे. '12th Fail'मध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या विक्रांत मेसीचंही सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला आहे. एकीकडे सिनेमा सुपरहिट होत असतानाच दुसरीकडे विक्रांत मेसीने आणखी एक खुशखबर दिली आहे. विक्रांत मेसी नुकताच बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे.
विक्रांत मेसीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. विक्रांतची पत्नी शीतलने ७ फेब्रुवारीला गोंडस बाळाला जन्म दिला. विक्रांत आणि शीतलला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. "आम्हाला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आम्हाला मुलगा झाला आहे," असं विक्रांतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. विक्रांतच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्याच अभिनंदन केलं आहे.
विक्रांत आणि शीतलने २०२२मध्ये लग्नगाठ बांधली होती. 'ब्रोकन बट ब्युटिफुल' या वेबी सीरिजच्या सेटवर ते पहिल्यांदा भेटले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांनी आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता लग्नाच्या २ वर्षांनी ते आईबाबा झाल्याने आनंदी आहेत.