'१२वीं फेल' अभिनेता रस्त्यावर करतोय मोमोजचा धंदा, आमिर खानपासून शाहिद कपूरसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:29 IST2025-03-06T16:28:27+5:302025-03-06T16:29:24+5:30

दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करूनही या अभिनेत्याला आता रस्त्याच्या कडेला मोमोज विकावे लागत आहेत.

'12th Fail' actor is doing momos business on the streets, has worked with Aamir Khan and Shahid Kapoor | '१२वीं फेल' अभिनेता रस्त्यावर करतोय मोमोजचा धंदा, आमिर खानपासून शाहिद कपूरसोबत केलंय काम

'१२वीं फेल' अभिनेता रस्त्यावर करतोय मोमोजचा धंदा, आमिर खानपासून शाहिद कपूरसोबत केलंय काम

बॉलिवूडमध्ये पाय रोवणे खूप कठीण आहे. चित्रपटांमध्ये एंट्री मिळाल्यानंतरही कलाकार काम मिळवण्यासाठी धडपडत असतात. अनेक वेळा विचारणा करूनही काम मिळत नाही. अनेक चित्रपटांतून आपली कला सादर करुनही कलाकारांना जागोजागी भटकंती करावी लागते. इतकेच नाही तर अनेक कलाकारांना अभिनय सोडून वेगळा मार्गदेखील निवडावा लागतो आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्याने मोठ्या बॅनरच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करूनही या अभिनेत्याला आता रस्त्याच्या कडेला मोमोज विकावे लागत आहेत.

२०२३ च्या शेवटी रिलीज झालेल्या विधू विनोद चोप्राच्या '१२वी फेल'(12th Fail Movie)मध्ये तुम्ही त्यांना पाहिले असेल. विक्रांत मेस्सीसोबत एका दृश्यात ते पाहायला मिळाले होते. लायब्ररीच्या आत शूट केलेल्या या दृश्यात ते लायब्ररीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत होते. भूपेंद्र तनेजा असे त्यांचे नाव आहे. छोट्याशा  भूमिकेतही त्यांनी अभिनयाचा पराक्रम दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. 

या चित्रपटांमध्ये केलंय त्यांनी काम
एवढेच नाही तर भूपेंद्र तनेजा यांच्या नावावर आणखी अनेक चित्रपट आहेत. भूपेंद्र तनेजा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय विश्वात सक्रिय आहेत. '१२ वी फेल' व्यतिरिक्त त्यांनी आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय ते विवेक रंजन अग्निहोत्रीचा सुपरहिट चित्रपट 'द कश्मीर फाइल्स'मध्येही दिसले होते. याशिवाय त्यांनी शाहिद कपूरच्या 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटातही काम केले आहे. 'गन्स अँड रोजेस' या वेब सीरिजमध्येही ते दिसले होते. २०१२ मध्ये 'रंगरूट'मध्येही त्यांनी काम केले होते.


मोमो स्टॉलचं ठेवलंय हे नाव
सध्या अभिनेते भूपेंद्र तनेजा मोमोज विकत आहेत. त्यांनी आपल्या मोमोज स्टॉलचे नावही '१२वी फेल' असे ठेवले आहे. ते स्वत: त्यांच्या दुकानात खाद्यपदार्थ बनवतात आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांना देतात. यामध्ये त्यांची पत्नी त्यांना मदत करते. त्यांनी हा बिझनेस त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केला आहे. कामाची कमतरता आणि साईड ॲक्टर्सना दिले जाणारे कमी पगार यामुळे त्यांना या वयातही हे काम करण्याची आवड निर्माण झाली आहे.

Web Title: '12th Fail' actor is doing momos business on the streets, has worked with Aamir Khan and Shahid Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.