अभिनेत्याचे निधन होऊन उलटले ११ दिवस, पण स्मशानाबाहेर आजही लागतेय रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 11:52 IST2021-11-13T11:52:33+5:302021-11-13T11:52:51+5:30

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

11 days have passed since the death of the actor, but there is still a queue outside the cemetery | अभिनेत्याचे निधन होऊन उलटले ११ दिवस, पण स्मशानाबाहेर आजही लागतेय रांग

अभिनेत्याचे निधन होऊन उलटले ११ दिवस, पण स्मशानाबाहेर आजही लागतेय रांग

कन्नड सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारचे लाखो चाहते त्यांच्या निधनाच्या वृत्ताच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. पुनीत यांच्या निधनाला ११ दिवस पूर्ण झाले आहेत. जिथे पुनीत राजकुमार यांचे हजारो चाहते जमले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत पहायला मिळत आहे की, दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो चाहते रांगेत उभे होते. तिथे पोहोचल्यानंतर भावूक लोकांनी पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली आणि आपली व्यथा मांडली. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ ला जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या वयाच्या ४६ व्या वर्षी पुनीत यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. पुनीत यांच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकलेल्या १० चाहत्यांच्या मृत्यूची प्रकरणे कर्नाटकात समोर आली. यात काही आत्महत्येची प्रकरणेही आहेत. पुनीतच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तीन चाहत्यांनी तर पुनीतसारखे मृत्यूपश्चात नेत्रदान करता यावे म्हणून आत्महत्या केली. पुनीत गेल्यानंतर अचानक कर्नाटकात नेत्रदानाचा आकडा वाढला आहे.

Web Title: 11 days have passed since the death of the actor, but there is still a queue outside the cemetery

टॅग्स :TollywoodTollywood