#10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 12:23 IST2019-01-16T12:22:32+5:302019-01-16T12:23:37+5:30

सोशल मीडियावर कुठला ट्रेंड येईल,सांगता येत नाही. येथे रोज नवनवे ट्रेंड येतात आणि गाजतात. काही दिवसांपूर्वी ‘किकी चॅलेंज’ने सोशल मीडियाला क्रेजी केले होते. आता असेच एक चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. होय, या चॅलेंजचे नाव आहे, 10 Year Challenge.

# 10YearChallenge: Hollywood bollywood Takes Over the #10YearChallenge | #10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ?

#10YearChallenge : हॉलिवूड, बॉलिवूडला वेड लावणारे 10 ईअर चॅलेंज म्हणजे काय रे भाऊ?

ठळक मुद्देतूर्तास हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत, आपल्यातील बदल स्वीकारले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये दिया मिर्झा, एकता कपूर, डायना पेंटी, ईशा गुप्ता अशा अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत आपले फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर कुठला ट्रेंड येईल,सांगता येत नाही. येथे रोज नवनवे ट्रेंड येतात आणि गाजतात. काही दिवसांपूर्वी ‘किकी चॅलेंज’ने सोशल मीडियाला क्रेजी केले होते. आता असेच एक चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. होय, या चॅलेंजचे नाव आहे, 10 Year Challenge. होय, 10 ईअर चॅलेंज. सध्या सोशल मीडियावर #10 Year Challenge हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. अर्थात बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या हॅशटॅगची भुरळ पडली आहे. आता हे चॅलेंज आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याचे उत्तर अगदी सोप्पे आहे. होय, तुमचा दहा वर्षांपूर्वीचा आणि अगदी आत्ताचा फोटो या चॅलेंजअंतर्गत शेअर करायचा, की झाले. २००९ आणि २०१९ या दोन्ही वर्षांतील फोटो शेअर करत स्वत:मधील बदल सकारात्मकरित्या स्वीकारणे, हे या चॅलेंजचे फलित आहे.
तूर्तास हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत, आपल्यातील बदल स्वीकारले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये दिया मिर्झा, एकता कपूर, डायना पेंटी, ईशा गुप्ता अशा अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत आपले फोटो शेअर केले आहेत. तेव्हा पाहुया, या चॅलेंजची एक झलक़....




 

Web Title: # 10YearChallenge: Hollywood bollywood Takes Over the #10YearChallenge