Genelia, Riteish Deshmukh Dance : जेनेलियानं केला रितेशसोबत नोरा फतेहीच्या गाण्यावर डान्स; मग अचानक असं काही झालं की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 21:23 IST2022-02-12T21:23:12+5:302022-02-12T21:23:55+5:30
Genelia, Riteish Deshmukh Dance Social Media: जनेलिया आणि रितेश सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहिल्याशिवाय राहवणार नाही.

Genelia, Riteish Deshmukh Dance : जेनेलियानं केला रितेशसोबत नोरा फतेहीच्या गाण्यावर डान्स; मग अचानक असं काही झालं की...
जेनेलिया आणि रितेश देशमुख (Genelia, Riteish Deshmukh) हे फिल्म इंडस्ट्रीमधील स्वीट कपल म्हणून ओळखलं जातं. जनेलिया सध्या मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती आपल्या फॅन्ससोबत कायमच अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करताना दिसते. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते नोरा फतेहीच्या डान्स मेरी रानीवर थिरकताना दिसत आहेत. परंतु अचानक असं काही होतं की सर्व काही बदलून जातं.
जेनेलिया रितेश हे दोघंही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. त्यांनी नुकताच एक शेअर केलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. ते या व्हिडीओत डान्स मेरी रानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. परंतु अचानकच जेनेलिया राग येतो आणि ती त्याला मारण्यास सुरूवात करते. सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
रिलेशनशिपला २० वर्षे
रितेश देशमुखनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. ही प्रेम नाही तर तुझ्याप्रती वेडेपणा आहे, असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं होतं. जेनेलिया आणि रितेश लग्नापूर्वी ९ वर्षे एकमेकांना डेट करत होते. २०१२ मध्ये त्यांनी विवाह केला.