हा मलाच दंड भरायला लावणार! चाहत्याचा 'प्रताप' पाहून सोनू सूदचं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:36 IST2022-04-29T13:32:27+5:302022-04-29T13:36:37+5:30

चाहत्याचा प्रताप पाहून सोनू सूदची मजेशीर कमेंट; वाचून हसाल

bollywood sonu sood has a hilarious reply for twitter user says pakka chalan katwayega | हा मलाच दंड भरायला लावणार! चाहत्याचा 'प्रताप' पाहून सोनू सूदचं मजेशीर उत्तर

हा मलाच दंड भरायला लावणार! चाहत्याचा 'प्रताप' पाहून सोनू सूदचं मजेशीर उत्तर

मुंबई: अभिनेता सोनू सूदनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एका चाहत्याचं ट्विट शेअर केलं आहे. सोनूनं त्याच्या चाहत्याचं ट्विट रिट्विट केलं आहे. याला नक्कीच दंड ठोठावला जाणार आणि मग तो मला भरावा लागणार, अशी मजेशीर कमेंट सोनूनं केली आहे. सोनूची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

सोनूनं एक ट्विट रिट्विट केलं. त्यामध्ये सोनूच्या चाहत्याचा फोटो आहे. सोनूचा चाहता बाईकवर बसला आहे. बाईकच्या मागे असलेल्या नंबर प्लेटसह त्यानं पोझ दिली आहे. विशेष म्हणजे त्या नंबर प्लेटवर नंबरच नाही. त्याजागी 'द रियल हिरो सोनू सूद सर', लिहिण्यात आलं आहे. चाहत्यानं ट्विटमध्ये सोनूला टॅग केला आहे. त्यावर सोनूनं मजेदार कमेंट केली आहे.

सोनू सूदनं हसणाऱ्या इमोजीसोबत ट्विटला रिप्लाय दिला. याला नक्कीच दंड होणार आणि तो माझ्याकडूनच भरून घेणार, अशी कमेंट सोनूनं केली. सोनूचा रिप्लाय पाहून इतर यूजर्सनंही मजेशीर ट्विट्स केली. सोनू सूनच्या चाहत्याचं चुकलंच, त्यानं नंबर प्लेटवर असं काही लिहायला नको, असं मत अनेकांनी व्यक्त केलं.

Web Title: bollywood sonu sood has a hilarious reply for twitter user says pakka chalan katwayega