व्हॅलेंटाइन डेला Arjun Kapoor च्या मिठीत दिसली Malaika Arora, PHOTO पेक्षाही रोमँटिक आहे कॅप्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:58 IST2022-02-14T14:57:50+5:302022-02-14T14:58:47+5:30

या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला आहे...

Bollywood Malaika Arora shares romantic photo with Arjun Kapoor | व्हॅलेंटाइन डेला Arjun Kapoor च्या मिठीत दिसली Malaika Arora, PHOTO पेक्षाही रोमँटिक आहे कॅप्शन

व्हॅलेंटाइन डेला Arjun Kapoor च्या मिठीत दिसली Malaika Arora, PHOTO पेक्षाही रोमँटिक आहे कॅप्शन

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाचे किस्से गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत ऐकायला मिळत आहेत. मलायका आणि अर्जुन यांचे एकमेकांवर प्रेम आहे. यात यात शंका नाही. आज व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मलायका अरोराने पुन्हा एकदा अर्जुन कपूर फक्त तिचाच असल्याचे सांगितले आहे. मलायकाने अर्जुनसोबतचा एक रोमँटिक फोटोही शेअर केला असून प्रेम व्यक्त केले आहे.

मलायकाने शेअर केला रोमँटिक फोटो - 
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अर्जुन कपूरला मिठी मारलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने डोळे मिटलेले आहेत, पण तिने अर्जुनला प्रेमाने आपल्या मिठीत घेतले आहे. तसेच, अर्जुनही आपल्या लेडी लव्हच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. मलायकाने या फोटोला 'मेरा', असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला आहे. त्याचवेळी अर्जुन कपूर काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ग्रे पायजाम्यावर दिसत आहे. दोघांच्याही या अतिशय रोमँटिक आणि कँडिड मोमेंटवर चाहतेही फिदा झाले आहेत. ट्विंकल खन्नाने फोटोवर 'Aww', अशी कमेंट केली आहे. तर महीप कपूर, राहुल खन्ना, गायिका लिसा मिश्रा यांनी दोघांनाही क्यूट म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

Web Title: Bollywood Malaika Arora shares romantic photo with Arjun Kapoor