VIDEO : गरीब लेकरं मागत होते पैसे, अ‍ॅक्ट्रेसनं केलं असं कृत्य; लोक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 10:17 IST2022-01-25T10:15:57+5:302022-01-25T10:17:54+5:30

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रश्मिका मंदान्ना एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. यावेळी काही मुले तिला घेरतात. ते रश्मिकाकडे पैसे मागतात पण...

Bollywood actress Rashmika mandanna slammed by netizens for not helping poor kids video viral | VIDEO : गरीब लेकरं मागत होते पैसे, अ‍ॅक्ट्रेसनं केलं असं कृत्य; लोक भडकले

VIDEO : गरीब लेकरं मागत होते पैसे, अ‍ॅक्ट्रेसनं केलं असं कृत्य; लोक भडकले

नवी दिल्ली - अ‍ॅक्ट्रेस रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या 'पुष्पा द राइज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिकाने अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) काम केले आहे. यातील दोघांचीही केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली आहे. सोमवारी रश्मिका मुंबईत स्पॉट झाली, याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असं काही घडले आहे की, लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरुवात केली.

व्हिडिओ पाहून लोक भडकले -
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रश्मिका मंदान्ना एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहे. यावेळी काही मुले तिला घेरतात. ते रश्मिकाकडे पैसे मागतात पण रश्मिका त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ती कॅमेऱ्यांना पोझ देत आपल्या कारमध्ये बसते. यानंतरही एक मुलगी रश्मिकाला म्हणते, दीदी पुष्पा आपलाच पिक्चर आहे ना? तेवढ्यात तेथे आणखी एक मुलगी येते, ती रश्मिकाकडे काही खाण्यासाठी पैसे मागते. पण रश्मिका त्यांना पैसे देत नाही आणि तेथून निघून जाते. 

काय म्हणतायत लोक... -
काही लोकांना रश्मिकाचे हे वागणे अथवा कृत्य आवडले नाही आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे रश्मिकाने त्या गरीब मुलांना मदत करायला हवी होती, असे लोकांचे म्हणणे आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, माणसाला चेहऱ्याने नाही, मनाने सुंदर असायला हवे. एकाने लिहिले आहे, मूड ऑफ झाला हे पाहून. दुसऱ्याने लिहिले, देण्यासाठी काही नव्हते तर काही बोलून तरू जायला हवे होते.

एका यूजरने लिहिले, किमान 100 रुपये तर देऊच शकत होती. काय फायदा एवढं कमावून. आणखी एकाने लिहिले, पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब आहेत हे लोक. अशा विविध प्रकारच्या कमेंट करून यूजर्सनी रश्मिकाला ट्रोल केले आहे.

Web Title: Bollywood actress Rashmika mandanna slammed by netizens for not helping poor kids video viral