फातिमा सना शेखने 'या' कारणामुळे पहिल्यांदा नाकारला होता 'दंगल' सिनेमा, म्हणाली- "ऑडिशन दिली नसती, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:41 IST2025-07-04T12:36:51+5:302025-07-04T12:41:42+5:30

फातिमा सना शेखने ब्लॉकबस्टर 'दंगल'साठी का दिलेला नकार? स्वत:च सांगितलं कारण, काय घडलेलं?

bollywood actress fatima sana shaikh reveals about she almost missed audition for dangal cinema says | फातिमा सना शेखने 'या' कारणामुळे पहिल्यांदा नाकारला होता 'दंगल' सिनेमा, म्हणाली- "ऑडिशन दिली नसती, तर..."

फातिमा सना शेखने 'या' कारणामुळे पहिल्यांदा नाकारला होता 'दंगल' सिनेमा, म्हणाली- "ऑडिशन दिली नसती, तर..."

Fatima Sana Shaikh: अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. दंगल गर्ल म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्रीचं नाव इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं. सध्या फातिमा तिचा आगामी चित्रपट मेट्रो इन दिनोंमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम मेहनत घेताना दिसतेय. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने 'दंगल' चित्रपटाविषयीच्या अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. 

अभिनेता  आमिर खान स्टारर 'दंगल' सिनेमा खूप गाजला.या चित्रपटात फातिमा शेखने गीता फोगाटची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या कामाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. परंतु या चित्रपटासाठी पहिल्यांदा अभिनेत्रीने नकार दिला होता. नुकतीच अभिनेत्रीने 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान ती म्हणाली, "मला जेव्हा दंगल ऑडिशन कॉल आला तेव्हा सुरुवातीला मी नकार दिला होता. त्यावेळी मी गीता फोगाटचं नाव गुगलवर सर्च केलं. तिचं वजन जवळपास ४९ किलो इतकं होतं. म्हणून मला वाटलं की तिच्यासारखी दिसेन का? परंतु कास्टिंग टीमने मला सांगितलं, 'जे काही असेल, पण तू ऑडिशन दे', जर मी ऑडिशन देणं थांबवलं असतं तर माझ्यामध्ये बदल झालाच नसता. जर तुम्ही मनापासून प्रयत्न केलेत तर नक्कीच संधी मिळते."

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने म्हटलं, "दंगलच्यापूर्वी माझ्याकडे फारसं कामही नव्हतं. पण, तेव्हा मला जे काही मिळालं ते मी करत गेले." परंतु त्यानंतर दंगल मिळाला आणि आयुष्य बदललं असंही फातिमाने मुलाखतीत सांगितलं. 

फातिमा गेल्यावर्षी 'सॅम बहादुर' सिनेमात दिसली. तसंच तिचा 'धक धक' सिनेमाही आला. याशिवाय तिने 'चाची ४२०', 'इश्क' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता लवकरच ती नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: bollywood actress fatima sana shaikh reveals about she almost missed audition for dangal cinema says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.