"त्याचे फ्लॉप चित्रपट सुद्धा...", सलमान खानच्या चित्रपटांच्या अपयशाबद्दल सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:28 IST2025-05-26T16:20:53+5:302025-05-26T16:28:17+5:30
"त्याचे फ्लॉप चित्रपट सुद्धा...", सलमान खानच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाला?

"त्याचे फ्लॉप चित्रपट सुद्धा...", सलमान खानच्या चित्रपटांच्या अपयशाबद्दल सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाला?
Suniel Shetty : अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) प्रमुख भूमिका असलेला केसरी वीर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. यादरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केसरी वीर ची संपूर्ण टीम व्यस्त असल्याची पाहायला मिळते आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीसलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अलिकडेच त्याचा प्रदर्शित झालेला 'सिकंदर' सिनेमा देखील फ्लॉप ठरला. यावर सुनील शेट्टीने भाईजानला पाठिंबा देत त्याच्या भावना व्यक्त केल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी त्याचा मित्र सलमानच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल आपलं मत मांडलं. त्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला,"आपण त्याच्या २०० कोटींच्या फ्लॉप चित्रपटाबद्दल कायम बोलतो, तर ते इंडस्ट्रीत हिट नाही तर सुपरहिट ठरतात. कधीकधी असंही होतं की, तुम्ही चुकीचे चित्रपट निवडता. पण, सलमान त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये अगदी मनापासून काम करतो.
पुढे अभिनेता म्हणाला, "जेव्हा सलमानला चांगला विषय असलेला चित्रपट मिळतो तेव्हा तो चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर कमाल करतो. त्याचे फ्लॉप चित्रपट सुद्धा २०० कोटी रुपयांची कमाई करतात. या वर्षीच्या सर्व चित्रपटांचे रेटिंग तपासा, तुम्हाला आढळेल की ते सलमान खानच्या चित्रपटापेक्षा कमी आहेत. असं वक्तव्य अभिनेत्याने केलं.