अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन; दिल्लीत अंत्यसंस्कार, इन्स्टावर व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 22:57 IST2026-02-17T22:50:46+5:302026-02-17T22:57:57+5:30

Bollywood Actor Sidharth Malhotra Father Sunil Malhotra Sad Demise: सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते.

bollywood actor sidharth malhotra father passes away funeral in delhi emotions expressed on Instagram | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन; दिल्लीत अंत्यसंस्कार, इन्स्टावर व्यक्त केल्या भावना

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन; दिल्लीत अंत्यसंस्कार, इन्स्टावर व्यक्त केल्या भावना

Bollywood Actor Sidharth Malhotra Father Sunil Malhotra Sad Demise: बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या वडिलांचे निधन झाले. १४ फेब्रुवारीला सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. पत्नी अभिनेत्री कियारा आडवाणी आणि कुटुंबातील जवळच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुनील मल्होत्रा यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ मल्होत्रा याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत वडील सुनील मल्होत्रा यांच्याबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

मंगळवारी रात्री सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याच्या वडिलांसोबतचे अनेक जुने फोटो होते. त्याच्या पोस्टमध्ये सिद्धार्थने लिहिले की, ते खूप प्रामाणिक, सत्य आणि मूल्य जपणारे होते. ते आपल्या मूल्यांनुसारच जगले. कधीही झुकले नाहीत. त्यांनी कधीही कठोर न होता, शिस्त शिकवली. त्यांनी अहंकाराशिवाय शक्तीचा अर्थ दाखवला. त्यांना आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, आयुष्याने परीक्षा पाहिली, परंतु, तरीही ते नेहमीच सकारात्मक राहिले, असे सिद्धार्थ मल्होत्रा याने म्हटले आहे. 

त्यांनी कधीही तडजोड केली नाही

सिद्धार्थ मल्होत्रा पोस्टमध्ये पुढे म्हणतो की, मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्राचे नेतृत्व करण्यापासून ते शांतपणे आणि धैर्याने आजारपणाचा सामना करण्यापर्यंत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी कधीही आपली शालीनता गमावली नाही. जेव्हा अर्धांगवायूचा झटका आल्यावर ते व्हीलचेअरवर असायचे. परंतु, तेव्हाही ते अढळ राहिले. बाबा, तुमचा प्रामाणिकपणा हा माझा वारसा आहे. तुमची शक्ती मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता अजूनही या कुटुंबाला एकत्र ठेवते. तुम्ही आम्हाला सोडून गेलात, परंतु तुम्ही मागे सोडलेल्या गोष्टी अफाट आहेत. मी जो काही आहे, तो तुमच्यामुळे आहे. आणि मी नेहमीच तुमचे नाव, तुमची मूल्ये पुढे नेईन.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सिद्धार्थ मल्होत्रा दिल्लीला गेला. ही बातमी मिळताच सिद्धार्थची पत्नी अभिनेत्री कियारा अडवाणी हीदेखील दिल्लीत पोहोचली. सिद्धार्थचे वडील बऱ्याच काळापासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने एका पॉडकास्टवर वडिलांच्या आजाराबद्दल सांगितले होते. 


Web Title : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा के पिता का निधन; दिल्ली में अंतिम संस्कार

Web Summary : सिद्धार्थ मल्होत्रा के पिता, सुनील मल्होत्रा, का दिल्ली में निधन हो गया। कियारा आडवाणी और परिवार की उपस्थिति में अंतिम संस्कार हुआ। सिद्धार्थ ने एक भावनात्मक इंस्टाग्राम पोस्ट साझा किया, जिसमें उन्होंने अपने पिता की ईमानदारी, शक्ति और सकारात्मक दृष्टिकोण को याद किया, जिसने उनके जीवन और मूल्यों को गहराई से प्रभावित किया। उन्होंने अपने पिता की विरासत को आगे बढ़ाने की कसम खाई।

Web Title : Actor Sidharth Malhotra's Father Passes Away; Last Rites in Delhi

Web Summary : Sidharth Malhotra's father, Sunil Malhotra, passed away in Delhi. The funeral took place with Kiara Advani and family present. Sidharth shared an emotional Instagram post, reminiscing about his father's integrity, strength, and positive outlook, which deeply influenced his life and values. He vowed to carry on his father's legacy.