Video : रणविर शौरीनं तयार केलं गाणं; "रिहाना तो बहाना है... पप्पू PM बनाना है"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 08:09 PM2021-02-05T20:09:01+5:302021-02-05T20:12:39+5:30

रणविर शौरीनं गाण्यातून साधला ग्रेटा थनबर्ग, रिहानावर निशाणा

bollywood actor ranvir shorey targeted greta thunberg and rihanna shared a video song pappu pm | Video : रणविर शौरीनं तयार केलं गाणं; "रिहाना तो बहाना है... पप्पू PM बनाना है"

Video : रणविर शौरीनं तयार केलं गाणं; "रिहाना तो बहाना है... पप्पू PM बनाना है"

googlenewsNext
ठळक मुद्देरणविर शौरीनं गाण्यातून साधला ग्रेटा थनबर्ग, रिहानावर निशाणाट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं गाणं

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. अशा परिस्थितीत २६ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळणही लागलं होतं. दरम्यान, या शेतकरी आंदोलनानं विदेशातील लोकांचं लक्षही आकर्षित करून घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वी पॉप स्टार रिहानंनं आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. त्यानंतर अनेक जागतिक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, रणविर शौरी यानं या प्रकरणावर एक गाणं तयार केलं आहे. त्यामध्ये ग्रेटा थनबर्ग, रिहाना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य लोकांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

रणविर शौरीनं गुरूवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो गिटार वाजवतानाही दिसत आहे. त्यानं आपल्या गाण्यातून ग्रेटा थनबर्ग, रिहाना यांच्यावर निशाणा साधला आहे.  'रिहाना तो बहाना, किसानों के कंधे से बंदूक चलाना है। ग्रेटा तो अनपढ़ है, मोदी को शर्मिंदा करके पप्पू को पीएम बनाना है' असं या गाण्याचे बोल आहेत. अनेकांनी त्याचा हा व्हिडीओ पसंत गेला आहे. लाखो युझर्सनं आतापर्यंत त्याचं हे गाणं पाहिलंदेखील आहे. 



रिहाना व्यतिरिक्त ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या नातेवाईक मीना हॅरिस यांनीदेखील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं होतं. त्यानंतर यावरून भारतात काहींनी याचा विरोध तर काहींनी याचं समर्थन केलं होतं. याव्यतिरिक्त भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शेतकरी आंदोलन देशांतर्गत मुद्दा असून त्यावरील बाहेरील टिपण्णीवर आक्षेप नोंदवला होता. याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयानं भारत विरोधी दुष्प्रचार सुरू असल्याचं सांगत याला विरोध आवश्यक असल्याचं म्हटलं. तसंच कोणीही कोणत्या माहितीशिवाय यावर वक्तव्य करू नये असंही सांगण्यात आलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतर अनेक भारतातील अनेक सेलिब्रिटींनी भारताच्या समर्थनार्थ ट्वीट केली होती. क्रिकेटमधील काही मंडळी असतील किंवा बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी अनेकांनी भारताविरोधातील तथाकथित परदेशी दुष्प्रचाराला विरोध केला होता.

Web Title: bollywood actor ranvir shorey targeted greta thunberg and rihanna shared a video song pappu pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.