"आम्हाला वाटतं आमची मुलं नेपो किड्स व्हावीत...", बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "माझी बायकोदेखील..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:20 IST2026-01-08T17:20:15+5:302026-01-08T17:20:40+5:30
अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. या दोघांनीही अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:च्या हिमतीने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. पुलकितलाही आपली मुलं नेपो किड्स व्हावीत असं वाटत आहे.

"आम्हाला वाटतं आमची मुलं नेपो किड्स व्हावीत...", बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "माझी बायकोदेखील..."
बॉलिवूड आणि नेपोटिझमबद्दल नेहमीच चर्चा होत असतात. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांची मुलं बॉलिवूडमध्ये कलाकार आहेत. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनीदेखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आई किंवा वडील बॉलिवूडमध्ये असल्यामुळे त्यांना पदार्पण करणं सोपं झालं. करण जोहरच्या सिनेमातूनच अनेक नेपो किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता आणखी एका बॉलिवूड कपलला आपली मुलंदेखील नेपो किड्स व्हावीत, असं वाटत आहे.
अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. या दोघांनीही अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:च्या हिमतीने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. पुलकितलाही आपली मुलं नेपो किड्स व्हावीत असं वाटत आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, "आम्ही नशीबवान आहोत की आम्ही दोघेही एकाच क्षेत्रात काम करतो. आम्ही आऊटसाइडर होतो आणि या इंडस्ट्रीमध्ये आज आम्ही स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे माझा आणि क्रितीचा हाच विचार आहे की आमची मुलं नेपो किड्स व्हावीत". पुलकित सम्राटने केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.
पुलकितने टेलिव्हिजनपासून काम करायला सुरुवात केली होती. 'बिट्टू बॉस' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, 'फुकरे' आणि 'सनम रे' या सिनेमांनी त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. इतर अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं असून आज पुलकित बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. तर पुलकितची पत्नी क्रिती खरबंदादेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रितीने 'हाऊसफुल ४', 'शादी मे जरूर आना', 'राज रिबुट', 'वीरे दी वेडिंग', 'यमला पगला दिवाना' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.