"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:59 IST2025-07-07T13:55:30+5:302025-07-07T13:59:44+5:30
"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला?
Ali Fazal On Nepotism : बॉलिवूडसारख्या झगमगत्या दुनियेत ठिकून राहायचं असेल तर संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. अनेकांनी सुरुवातीपासूनच संघर्ष करत इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. या प्रवासात अनेकांना चांगले वाईट अनुभव येतात. त्यातच बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर अनेक चर्चा आणि वादविवाद दिसतात. बरेच कलाकार यावर व्यक्त होत असतात. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता अली फजलने (Ali Fazal) इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर आपलं भाष्य केलं आहे.
'मिर्झापूर' सीरिजमुळे चर्चेत आलेला गुड्डू भैय्या म्हणजेच अभिनेता अली फजल सध्या त्याच्या 'मेट्रो इन दिनों' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. ४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचदरम्यान, अभिनेत्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कास्टिंग सिस्टिम आणि नेपोटिझमबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यावेळी तो म्हणाला, "मला या गोष्टींचं फारसं काही वाटत नाही. कारण, इंडस्ट्रीत यापेक्षा अजुन बऱ्याच समस्या आहेत. बॉलिवूडमध्ये काम मिळणं हे तुम्ही कोणत्या ग्रुपचा भाग आहात यावर अवलंबून असतं. याउलट हॉलिवूडमध्ये एजन्सीद्वारे कास्टिंग केलं जातं. ज्यामुळे प्रत्येक कलाकाराला समान संधी उपलब्ध आहेत."
त्यानंतर अभिनेत्याने म्हटलं, "हॉलिवूडमध्ये कामाची पद्धत फार वेगळी आहे. हॉलिवूडमध्येही चुकीच्या गोष्टी घडतात, पण तिथे एक पारदर्शक व्यवस्था आहे, ज्यामुळे अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे चालतात." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.