बॉलिवूडच्या टॉप 5 सुंदर फिमेल सिंगर्स; यातील 'या' दोघी घेतात सर्वाधिक मानधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 15:20 IST2018-08-14T15:18:18+5:302018-08-14T15:20:37+5:30

बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यांमुळे नावारूपाला आलेल्या गायिकांचाही मोठा चाहता वर्ग आहे.

Bollywood 5 female singers and their husband | बॉलिवूडच्या टॉप 5 सुंदर फिमेल सिंगर्स; यातील 'या' दोघी घेतात सर्वाधिक मानधन!

बॉलिवूडच्या टॉप 5 सुंदर फिमेल सिंगर्स; यातील 'या' दोघी घेतात सर्वाधिक मानधन!

बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यांमुळे नावारूपाला आलेल्या गायिकांचाही मोठा चाहता वर्ग आहे. जाणून घेऊयात अशा काही फिमेल सिंगर्सबाबत आणि त्यांच्या लग्नाबाबत ज्या गेले कित्येक दिवस आपल्या आवाजाने  चाहत्यांना भूरळ घालत आहेत. 

आजही आपल्या दमदार आवाजाने संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या फिमेल सिंगर्सच्या यादीमध्ये सुनिधि चौहानचा पहिला क्रमांक लागतो. सुनिधीने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरली आहेत. सुनिधीने  2012मध्ये हितेश सोनीसोबत लग्न केलं. त्याआधी सुनिधिनं लग्न बाबू खानसोबत घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं होतं. त्यानंतर एका वर्षातचं त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. सुनिधि एका गाण्यासाठी 12 लाख रूपये घेते. 

'फुकरे' चित्रपटातील गाजलेलं गाणं अंबरसरियामुळे फेमस झालेली सिंगर सोना महापात्रा. तिने म्युझिक डायरेक्टर राम संपथसोबत लग्न केलं आहे. 

सिंगर कनिका कपूर जितकी आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती आपल्या हटके लूकसाठीही प्रसिद्ध आहे. सुपरहिट ठरलेल्या 'बेबी डॉल'मुळे कनिका खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. तिनं 1997मध्ये राज चंदोकसोबत लग्न केलं. 

टी-सीरिज कॅसेट्सचे मालक आणि पार्श्वगायक गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमारची चाहत्यांमध्ये फार चर्चा असते. 2012मध्ये आलेल्या 'आशिकी 2' या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने तुलसी कुमार चर्चेत आली. त्यानंतर तिने हितेश रल्हानसोबत 2015मध्ये लग्न केलं. 

बॉलिवूडमध्ये आपल्या गोड आवाजासाठी प्रसिद्ध असलेली सिंगर म्हणजे श्रेया घोषाल. श्रेयाने सिंगिंग रियालिटी शोमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. जेवढा सुंदर तिचा आवाज आहे तेवढीच सुंदर ती आहे. श्रेयाने 2015मध्ये शैलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केलं. बॉलिवूडमध्ये गाण्यांसाठी मोठी रक्कम घेणाऱ्या सिंगर्सच्या यादीमध्ये श्रेयाचा नंबर लागतो. ती एका गाण्यासाठी 18 ते 15 लाख रूपये घेते. 

Web Title: Bollywood 5 female singers and their husband