धर्मेंद्रसारखाच  हॅंडसम आहे बॉबी देओलचा मुलगा, पहिल्यांदाच समोर आला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 14:49 IST2018-06-27T14:47:32+5:302018-06-27T14:49:15+5:30

आर्यमानची पहिली झलक नुकत्याच बॅंकॉकमध्ये झालेल्या IIFA सोहळ्यावेळी बघायला मिळाली. बॉबीसोबत आर्यमान आला होता.

Bobby Deol son Aryaman picture gone viral on internet | धर्मेंद्रसारखाच  हॅंडसम आहे बॉबी देओलचा मुलगा, पहिल्यांदाच समोर आला फोटो

धर्मेंद्रसारखाच  हॅंडसम आहे बॉबी देओलचा मुलगा, पहिल्यांदाच समोर आला फोटो

मुंबई : रेस 3 सिनेमातील बॉबी देओलच्या कामाचं भलेही कुणी फार कौतुक केलं नाही. पण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे बॉबी देओल चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण बॉबीचा मुलगा आहे. पहिल्यांदाच बॉबीचा मुलगा आर्यमानचा फोटो समोर आलाय. 

आर्यमानची पहिली झलक नुकत्याच बॅंकॉकमध्ये झालेल्या IIFA सोहळ्यावेळी बघायला मिळाली. बॉबीसोबत आर्यमान आला होता. आर्यमान हा आता 16 वर्षांचा असून मीडियापासून दूर राहतो. पण हा फोटो पाहिल्यावर सोशल मीडियात त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. आर्यमान हा धर्मेंद्र यांचासारखाच हॅंडसम दिसतो अशा प्रतिक्रिया येत आहेत. 

आर्यमानचा हा लूक पाहून त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीबाबतही चर्चा रंगली आहे. पण आर्यमान अजून लहान असल्याने त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीची शक्यता सध्याच कमी आहे.

पण सनी देओल त्याचा मुलगा करण देओल याला 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. सनी देओल हा सिनेमा स्वत: दिग्दर्शित केलाय. 

Web Title: Bobby Deol son Aryaman picture gone viral on internet