Bloody Daddy Trailer : ड्रग्स माफियांसोबतची लढाई अन् दमदार अॅक्शन, शाहिद कपूरच्या 'ब्लडी डैडी'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:40 IST2023-05-24T15:39:27+5:302023-05-24T15:40:07+5:30
शाहिद कपूर(Shahid Kapoor)चा आगामी चित्रपट ब्लडी डॅडी(Bloody Daddy)चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Bloody Daddy Trailer : ड्रग्स माफियांसोबतची लढाई अन् दमदार अॅक्शन, शाहिद कपूरच्या 'ब्लडी डैडी'चा ट्रेलर रिलीज
शाहिद कपूर(Shahid Kapoor)चा आगामी चित्रपट ब्लडी डॅडी(Bloody Daddy)चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये शाहिद कपूर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो ड्रग माफियांशी लढताना दिसत आहे. त्याच्याशिवाय डायना पेंटी, संजय कपूर, रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
शाहिद कपूर पुन्हा एकदा ओटीटीवर आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने फर्जी या वेब सिरीजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले. आता तो त्याच्या आगामी ब्लडी डॅडीसाठी तयार आहे. तो थेट जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल. एप्रिलमध्ये शाहिद कपूरने या चित्रपटाशी संबंधित त्याचे पोस्टर रिलीज केले होते. मंगळवारी त्यांनी ट्रेलरची घोषणा केली.
यासोबत त्याने लिहिले, "हे खूप धोकादायक असणार आहे. ब्लडी डॅडीचा ट्रेलर उद्या (बुधवार २४ मे) रिलीज होणार आहे."
आता ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याची स्टाइल चाहत्यांना खूप आवडते आहे. शाहिद कपूरने बुधवारी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. यासोबत त्याने लिहिले, "ती खूप रक्तरंजित रात्र होती. ट्रेलर रिलीज झाला आहे. ९ जूनपासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होईल." यामध्ये शाहिद कपूर ड्रग माफियांशी लढताना दिसत आहे.
अली अब्बास जफरने याचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन सीन्सबद्दल बोलताना अभिनेत्याने अली अब्बास जफरचे कौतुकही केले. सिनेमॅटीकची समज असल्याचे त्याने सांगितले. हा चित्रपट १२ तासांच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये शाहिद कपूर जबरदस्त अभिनय करताना दिसत आहे.