याला म्हणतात कमबॅक! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'हा' लोकप्रिय अभिनेता घेतोय एन्ट्री, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:11 IST2025-12-27T15:02:29+5:302025-12-27T15:11:13+5:30
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री, प्रोमो आला समोर

याला म्हणतात कमबॅक! 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'हा' लोकप्रिय अभिनेता घेतोय एन्ट्री, कोण आहे तो?
Yed Lagla Premach New Promo: स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका गेल्या वर्षाभरापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. अभिनेत्री पूजा बिरारी, विशाल निकम यांची प्रमुख असलेल्या मालिकेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.महाराष्ट्राच्या या लोकप्रिय मालिकेत सध्या राया-मंजिरीच्या लग्नाचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे. मालिकेचं हे कथानक रंजक वळणावर असताना आता नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.
येड लागलं प्रेमाचं मालिकेत नुकतंच राया मंजिरीचं लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. अनेक अडचणींना समोरं जात हे दोघे आयुष्यभरासाठी सोबत आले. मात्र,याचदरम्यान रायानेच आपल्या मुलाला मारल्याचं सत्य जीजीला समजतं आणि भलतच घडतं. पण, मंजिरी आपल्या निर्णयावर ठाम राहते आणि रायाची साथ देते.रायावर ती विश्वास दाखवते. तिच्या या वागण्याचा जीजीला प्रचंड त्रास होतो आणि ती या दोघांना घराबाहेर काढते. आता मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आता मंजिरीच्या आयुष्यात तिच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच मिहीरची एन्ट्री होणार आहे. हा प्रोमो प्रेक्षकांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.
"मंजिरी आणि रायच्या संसारात येणार हे नवे वादळ!", असं कॅप्शन देत वाहिनीकडून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'बिग बॉस मराठी ५' फेम वैभव चव्हाण आता मिहिरची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे आता मालिकेमध्ये मिहिरच्या एन्ट्रीने काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वैभव चव्हाणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर झी मराठीच्या 'मन झालं बाजिंद' या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकला. त्यानंतर बिग बॉसच्या शो मध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमाने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.