रितेशने सांगूनही सुधरली नाही, अखेर रुचिता जामदार घराबाहेर; मिठी मारून रडली, विशालला बसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 14:32 IST2026-03-07T14:31:49+5:302026-03-07T14:32:15+5:30

गेल्या आठवड्यात रोशन भजनकर घराबाहेर गेला होता. आता या आठवड्यात टोळीतील आणखी एक व्यक्ती बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेणार आहे. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून घरातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी हिंट मिळाली आहे. 

bigg boss marathi 6 ruchita jamdar will levaes the house exit from the show shocking elimination | रितेशने सांगूनही सुधरली नाही, अखेर रुचिता जामदार घराबाहेर; मिठी मारून रडली, विशालला बसला मोठा धक्का

रितेशने सांगूनही सुधरली नाही, अखेर रुचिता जामदार घराबाहेर; मिठी मारून रडली, विशालला बसला मोठा धक्का

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं आणि धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. गेल्या आठवड्यात रोशन भजनकर घराबाहेर गेला होता. आता या आठवड्यात टोळीतील आणखी एक व्यक्ती बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेणार आहे. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून घरातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी हिंट मिळाली आहे. 

या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसणार आहे. कारण पहिल्या आठवड्यापासून घरातील चर्चेतील चेहरा असलेली रुचिता जामदार घराबाहेर जाणार असल्याची शक्यता आहे. नव्या प्रोमोमध्ये रितेश म्हणतो, "जेव्हा घरात गेमला हलकं घेतलं जातं तेव्हा बिग बॉस आणि मी अॅक्शन घेतो. त्यामुळे या क्षणी होणार आहे घरातलं एलिमिनेशन". यानंतर रितेश सदस्याला नावाची पाटी काढून आणायला सांगतो. 


बिग बॉस मराठीच्या या प्रोमोमध्ये रुचिता रडताना दिसत आहे. सागर कारंडेला मिठी मारून ती रडते. तर तिच्या एलिमिनेशनने विशाल कोटियनलाही मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. एका बिग बॉस मराठीचे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुनही रुचिता घराबाहेर जाणार असल्याचं कन्फर्म सांगण्यात आलं आहे. रुचिताच्या एलिमिनेशनमुळे घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसणार आहे. 

रुचिताने पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात गेम खेळायला सुरुवात केली होती. पण, तिच्याकडून अनेक चुका झाल्या, ज्यामुळे तिला भाऊच्या धक्क्यावर रितेशकडून सुनावण्यातही आलं होतं. रितेशने वारंवार सांगूनही रुचिता ऐकली नाही. त्यामुळे तिला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. मात्र रुचिताच्या एक्झिटमुळे चाहते नाराज आहेत. स्ट्राँग स्पर्धक असूनही रुचिताला घराबाहेर काढल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Web Title : चेतावनी के बावजूद, रुचिता जामदार बिग बॉस मराठी 6 से बाहर

Web Summary : रुचिता जामदार की बिग बॉस यात्रा निष्कासन के बाद समाप्त हुई। चेतावनी के बावजूद, वह सुधार करने में विफल रहीं, जिससे उन्हें बाहर होना पड़ा। उनके जाने से विशाल कोटियन हैरान रह गए।

Web Title : Despite warnings, Ruchita Jamdar evicted from Bigg Boss Marathi 6

Web Summary : Ruchita Jamdar's Bigg Boss journey ends after eviction. Despite warnings, she failed to improve, leading to her exit. Her departure shocked Vishal Kotian.