Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:09 IST2026-01-11T12:09:24+5:302026-01-11T12:09:47+5:30
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची चाहते कधीपासून वाट बघत होते. अखेर 'बिग बॉस मराठी ६' हे पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची चाहते कधीपासून वाट बघत होते. अखेर 'बिग बॉस मराठी ६' हे पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचं पर्व खास असणार आहे. कारण या पर्वात अनेक नवे चेहरे चाहत्यांना दिसणार असून 'बिग बॉस मराठी ६'ची थीमही खास असणार आहे. या पर्वात स्पर्धकांना मोठ्या हुशारीने हा खेळ खेळावा लागणार असून घरात टिकून राहण्यासाठी शक्कल लढवावी लागणार आहे.
यंदाची थीम काय असणार आहे?
दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार... अशी टॅगलाइन घेऊन 'बिग बॉस मराठी ६' सुरू होत आहे. यंदाच्या पर्वात स्पर्धकांना अनेक धक्के बसणार आहेत. यंदाची थीम देखील चकवा देणारी आहे. ८०० खिडक्या अन् ९०० दारांनी बिग बॉसचं घर सजवण्यात आलं आहे. या घरातही अनेक दरवाजे आहेत. आता कोणत्या दरवाजामागे काय दडलंय? यामागचं रहस्य गेममध्ये उलगडणार आहे.
कुठे पाहाल 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन?
'बिग बॉस मराठी ६' हे पर्व आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज या नवा पर्वाचा ग्रँड प्रिमियर होणार असून त्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमियर सोहळा कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रात्री ८ वाजता 'बिग बॉस मराठी ६'चं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
'बिग बॉस मराठी ६'चे स्पर्धक कोण?
यंदाच्या पर्वात अनेक मोठे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. लावणी डान्सर राधा पाटील मुंबईकर, कंटेट क्रिएटर करण सोनावणे, सोनाली राऊत, अनुश्री माने, अभिनेता आयुष संजीव, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे, अभिनेत्री दिपाली सय्यद, राकेश बापट या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर श्रेयस तळपदेदेखील यंदाच्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.