Bigg Boss Marathi 4 : तुझीच नजर लागली, झालं तुझ्या मनासारखं..., तेजस्विनीसाठी ढसाढसा रडणाऱ्या अमृताना नेटकऱ्यांनी सुनावलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:52 PM2022-12-01T14:52:32+5:302022-12-01T14:53:08+5:30

Bigg Boss Marathi 4 : तेजस्विनी घराबाहेर गेल्यावर अमृता ढसाढसा रडतेय म्हटल्यावर प्रेक्षकांना साहजिकच अमृताचा हा ड्रामा आवडला नाही. मग काय? अनेकांनी अमृताला चांगलंच सुनावलं.

Bigg Boss Marathi 4 Tejaswini Lonari Left House Amruta Dhongade Cry Netizens Troll | Bigg Boss Marathi 4 : तुझीच नजर लागली, झालं तुझ्या मनासारखं..., तेजस्विनीसाठी ढसाढसा रडणाऱ्या अमृताना नेटकऱ्यांनी सुनावलं...!!

Bigg Boss Marathi 4 : तुझीच नजर लागली, झालं तुझ्या मनासारखं..., तेजस्विनीसाठी ढसाढसा रडणाऱ्या अमृताना नेटकऱ्यांनी सुनावलं...!!

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4 )सध्या जाम चर्चेत आहे. नुकतेच चार नवे सदस्य घरात आले आहेत. यात ड्रामा क्वीन राखी सावंतचाही समावेश आहे. राखी घरात आल्यावर घरात नुसते राडे सुरू आहेत. हे सगळं सुरू असताना सर्वांची आवडती स्पर्धक तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari ) घराबाहेर पडली आहे. होय, हाताला गंभीर दुखापत झाल्याने तेजस्विनी लोणारीला गेम मध्येच सोडावा लागला. तेजस्विनीला  निरोप देताना घरातील प्रत्येक सदस्य भावुक झालेला दिसला. अमृता धोंगडे (Amruta Dhongade) तर ढसाढसा रडली. पण अमृताच्या या अश्रूंना नेटकऱ्यांनी ‘फेक’ ठरवलं.

अमृता व तेजस्विनी पहिल्याच आठवड्यापासून मैत्रिणी बनल्या होत्या. अगदी दोघींतही घट्ट मैत्री झाली होती. पण बिग बॉसच्या घरात नाती बनायला आणि बिघडायला वेळ लागत नाही म्हणतात ना. तसंच या दोघींबद्दल झालं.  गेल्याच आठवड्यात दोघींमध्ये इतके मतभेद झालेत की, अमृता आपल्या घट्ट मैत्रिणीबद्दलच वाईट बोलताना दिसली.   तेजस्विनीबद्दल अमृता घरातील इतर सदस्यांकडे नको ते बोलली. अगदी यावरुन महेश मांजरेकरांनीही चावडीमध्ये अमृताची कानउघडणीही केली होती. आता तेजस्विनी घराबाहेर गेल्यावर अमृता ढसाढसा रडतेय म्हटल्यावर  प्रेक्षकांना साहजिकच अमृताचा हा ड्रामा आवडला नाही. मग काय? अनेकांनी अमृताला चांगलंच सुनावलं.

अमृताच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तेजस्विनी व तिचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला. या व्हिडीओला ‘ही दोस्ती तुटायची नाय’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तर नेटकऱ्यांनी अमृताला अक्षरश: धारेवर धरलं. 

तुझीच नजर लागली. झालं तुझ्या मनासारखं, आता खोटे अश्रू गाळू नकोस..., अशा शब्दांत लोकांनी अमृताला सुनावलं. तिला एवढं बदनाम करुन आता तुला वाईट वाटतंय, अशी कमेंट एका युजरने केली. जेव्हा ती तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. तेव्हा तू तिच्यापासून लांब जात होतीस. तुला तिची मैत्री व प्रेम नको होतं. तिला किरण मानेंनी एक नंबर दिला त्याचाही तुला त्रास झाला. मग आता रडून काय फायदा? असं एकाने अमृताला सुनावलं. आता रडून काही फायदा नाही. मागच्या आठवड्यात सगळ्यांनी मिळून तिला त्रास दिला, आता झालं तुमच्या मनासारखं, अशी कमेंट एका युजरने केली.

Web Title: Bigg Boss Marathi 4 Tejaswini Lonari Left House Amruta Dhongade Cry Netizens Troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.