"चड्डीत राहायचं, चल निघ...", गावी जा म्हणत हिणवणाऱ्या बसीरची अखेर प्रणित मोरेने केली बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:54 IST2025-10-03T15:54:37+5:302025-10-03T15:54:59+5:30
मराठमोळ्या प्रणित मोरेला बसीर अलीने "गावी जा" म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे बसीरला चांगलंच ट्रोलही केलं गेलं. तर सलमान खाननेही त्याला धारेवर धरलं होतं. आता नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणित मोरेने बसीरला सुनावलं आहे.

"चड्डीत राहायचं, चल निघ...", गावी जा म्हणत हिणवणाऱ्या बसीरची अखेर प्रणित मोरेने केली बोलती बंद
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरात वाद होताना दिसत आहेत. मराठमोळ्या प्रणित मोरेला बसीर अलीने "गावी जा" म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे बसीरला चांगलंच ट्रोलही केलं गेलं. तर सलमान खाननेही त्याला धारेवर धरलं होतं. आता नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणित मोरेने बसीरला सुनावलं आहे. नव्या कॅप्टनसाठी 'बिग बॉस १९'च्या घरात टास्क घेण्यात आला. या टास्कमध्ये डायनोसॉरला अंडी खाऊ घालत एक एक सदस्याला या कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर काढायचं होतं.
कॅप्टन्सी टास्कच्या या एका राऊंडमध्ये प्रणितला केअर टेकर बनवलं होतं. तेव्हा प्रणित म्हणाला, "बसीरला वाटतं की नेहमी नॉमिनेट करून तो मला घरी पाठवेल. बसीर मला म्हणाला होता तू गावी जा...पण त्याला माहीत नाही हा संपूर्ण महाराष्ट्रच माझं गाव आहे. आता तू घरी जा...चड्डीत राहा आणि चल निघ. एकटा आलोय...एकटा घेऊन जाईन तुम्हा सगळ्यांना...".
Now #PranitMore cooked #BaseerAli again in #BiggBoss19pic.twitter.com/xv0Z3j1Kgn
— Lady Khabri (@KhabriBossLady) October 2, 2025
त्यानंतर बसीर प्रणितला म्हणतो "तुला असं पण इथून काढून टाकणार आहे...थांब जरा". त्यावर प्रणित म्हणतो, "मला इथून काढूनच दाखव". नंतर बसीर म्हणतो की, "आम्ही सगळे मिळून तुला इथून काढून टाकू. आता वेळ आमची आहे". प्रणित बसीरला रिप्लाय देतो की "बघुया कोण जातंय...तू पण इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. मी याच शोमध्ये तुझ्यापेक्षा जास्त टिकवून दाखवेन". त्यानंतर प्रणित आणि बसीर या शोमधून पहिलं कोण जाणार, याची पैज लावतात.