Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:28 PM2023-02-03T16:28:44+5:302023-02-03T16:29:50+5:30

Bigg Boss 16: शेवटच्या आठवड्यातील शेवटच्या टॉर्चरिंग टास्कमध्ये प्रियांका, अर्चना आणि शालिनने शिव ठाकरे, निम्रत कौर व एमसी स्टॅनला जबरदस्त टॉर्चर केलं.

Bigg Boss 16: Torture Task Brings Out The Worst In Archana Gautam | Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO

googlenewsNext

Bigg Boss 16:  बिग बॉस १६ हा शो अंतिम टप्प्यात आला आहे. फिनालेला अगदी काही दिवस उरले आहेत. साहजिकच आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. फिनालेच्या आठवडाभरापूर्वी घरात एक भयंकर टास्क झाला. अर्चना गौतमने ज्या प्रकारे या टास्कमध्ये खुन्नस काढली की ते पाहून अनेकांना धक्का बसला. शेवटच्या आठवड्यातील शेवटच्या टॉर्चरिंग टास्कमध्ये प्रियांका, अर्चना आणि शालिनने शिव ठाकरे, निम्रत कौर व एमसी स्टॅनला जबरदस्त टॉर्चर केलं.

दुसऱ्या टीमनं कितीही टॉर्चर केलं पहिल्या टीमला जागेवरून हलायचं नाही, असा हा टास्क होता. या टास्कदरम्यान अर्चना, प्रियंका व शालीनने शिवच्या टीमला नको त्या पद्धतीने टॉर्चर केलं. पण त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.
या टास्कमध्ये अर्चनाने निम्रतला टार्गेट केलं. इतकं की, निम्रत जोरजोरात रडताना दिसली. फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. कमजोर दिलवाले इसे ना देखें, असं म्हणत हा व्हिडीओ व्हायरल होतोय. टास्कमध्ये अर्चना शिवच्या तोंडावर मिरची आणि हळदीची पूड फेकताना दिसली.  बर्फ, कचरा साबण सारख्या वस्तू वापरून तिने तिघांनाही टॉर्चर करण्यात आलं.

निम्रतच्या डोळ्यांची आग व्हायला लागल्यामुळे ती रडायला लागली.  शिवनं मात्र सगळं मुकाट्यानं सहन केलंय. संपूर्ण टास्कमध्ये शिवनं तोंडातून एक शब्दही काढला नाही. टास्कमध्ये त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.   त्याचा उजवा डोळा उघडणं देखील त्याला कठीण झालं होतं. एका डोळ्यावर हात ठेवून तो घरभर फिरत होता.  तो डोळायाच टास्कदरम्यान शालीन व एमसी स्टॅनचं भांडणही पाहायला मिळालं. यानंतर एमसी रडायला लागला.
 पुढच्या राऊंडमध्ये शिवनं अर्चना, प्रियांका आणि शालिन यांच्याबरोबर त्यांच्यासारखी कोणतीही हिंसक कृती केली नाही.

Web Title: Bigg Boss 16: Torture Task Brings Out The Worst In Archana Gautam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.