मोठी अपडेट! हल्लेखोराने मुलांना काही केले नाही, मेडला ओलीस ठेवले; केलेली १ कोटी रुपयांची मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:22 IST2025-01-16T19:21:47+5:302025-01-16T19:22:15+5:30

Saif Ali khan Attack Update: सैफवर रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.

Big update! The Saif Ali khan attacker did nothing to the children, kept the maid hostage; demanded Rs 1 crore... | मोठी अपडेट! हल्लेखोराने मुलांना काही केले नाही, मेडला ओलीस ठेवले; केलेली १ कोटी रुपयांची मागणी...

मोठी अपडेट! हल्लेखोराने मुलांना काही केले नाही, मेडला ओलीस ठेवले; केलेली १ कोटी रुपयांची मागणी...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरातच चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसला असून त्याचा फोटोही जारी करण्यात आला आहे. हल्लेखोराने सैफच्या घरात काय केले याची मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ-करिनाच्या मुलांना सांभाळणाऱ्या दायीला ओलीस ठेवत तिच्याकडे १ कोटी रुपयांची मागणी केली होती, असे चौकशीत समोर येत आहे. 

सैफवर रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. पोलिसांना संशयीत आरोपी सैफच्या घरातून पायऱ्या उतरत असलेला एक सीसीटी फुटेज मिळाले आहे.

सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फायर एग्झिटच्या पायऱ्यांवरुन घरात घुसला होता असा पोलिसांचा कयास होता. परंतू, मुलांना सांभाळणाऱ्या दायीने दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोराने दायीकडे पैशांची मागणी केल्याचे समोर येत आहे. 

हल्लेखोर घरात घुसला तेव्हा त्याने तैमुरला आणि दायीला पाहिले. त्याने तिच्याकडे १ कोटी रुपयांची मागणी केली. त्याने सैफ अली खानकडे काही मागितले नाही. तसेच मुलांनाही ओलीस ठेवले नाही. त्याने मुलांना सांभाळणाऱ्या दायीला ओलीस ठेवले होते. तिने आरडाओरडा करताच हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केला. ते ऐकून सैफ धावत तिथे आला. यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोराने सैफवर सहा वेळा चाकुचे वार केले, असे चौकशीत समोर येत आहे. 

Web Title: Big update! The Saif Ali khan attacker did nothing to the children, kept the maid hostage; demanded Rs 1 crore...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.