बँकॉकवरून परतल्यानंतर आजारी पडली भारती सिंग, येतोय ताप, चाहते म्हणाले - "कोविड चेक कर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:46 IST2025-05-29T15:45:52+5:302025-05-29T15:46:19+5:30

Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आपल्या युट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांना दैनंदिन जीवनाची झलक शेअर करत असते. नुकताच भारती सिंगने एक व्हिडीओ अपलोड केला आहे, जो पाहून चाहत्यांचे टेंशन वाढलं आहे.

Bharti Singh fell ill after returning from Bangkok, fever is coming, fans said - "Do a covid check..." | बँकॉकवरून परतल्यानंतर आजारी पडली भारती सिंग, येतोय ताप, चाहते म्हणाले - "कोविड चेक कर.."

बँकॉकवरून परतल्यानंतर आजारी पडली भारती सिंग, येतोय ताप, चाहते म्हणाले - "कोविड चेक कर.."

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आपल्या युट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांना दैनंदिन जीवनाची झलक शेअर करत असते. नुकताच भारती सिंगने एक व्हिडीओ अपलोड केला आहे, जो पाहून चाहत्यांचे टेंशन वाढलं आहे. खरेतर कॉमेडियनने सांगितले की, तिला आजारी असल्यासारखे वाटत आहे आणि ती ब्लड टेस्टदेखील करताना दिसते आहे.

व्लॉगमध्ये भारती सिंगने सांगितले की, तिला सध्या ताप आहे आणि तिला बरं वाटत नाहीये. "मी बँकॉकहून परत आल्यापासून मला सुस्ती आणि अस्वस्थता जाणवत आहे. म्हणून, हर्षने माझे ब्लड टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला," भारती व्हिडीओमध्ये म्हणाली. व्हिडिओमध्ये, भारती इंजेक्शन घेण्याच्या विचाराने भावनिक होते आणि रडू लागते. मात्र, व्हिडीओमध्ये ती रक्त तपासणी करताना दिसते. भारतीला रक्त तपासणी करताना पाहून तिचा मुलगा चकित होतो आणि विचारतो की हे काय आहे. दरम्यान, हर्ष त्याच्या मुलाला विनोदाने इशारा देतो की जर तो जास्त चॉकलेट खात राहिला तर त्यालाही इंजेक्शन मारावे लागेल.

व्लॉगमध्ये भारती सिंगने आपल्या प्रेक्षकांना नियमित ब्लड टेस्ट आणि फुल बॉडी चेकअप करून आपल्या तब्येतीला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. यावेळी भारतीने खुलासा केला की, तिने आधीपासून तिच्या रुटीनमध्ये ७० टक्के सुधारणा केली आहे आणि आपल्या ध्येयाकडे पुढे जात आहे. आपल्या नेहमींच्या सवयींचा उल्लेख करताना भारती म्हणाली की, आता तिने स्ट्रिक्ट झोपण्याची एक वेळ निश्चित केली आहे आणि ती व गोला दोघे रात्री १०.३० वाजेपर्यंत झोपतात. 


संध्याकाळी भारतीला परत ताप आला आणि हर्षने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले की, हे फक्त थकव्यामुळे होत आहे. भारतीच्या घरातील मदतनीसने तिच्यासाठी मोरिंगा सूप बनवले कारण ती अस्वस्थ होती.

कोरोनाची टेस्ट करण्याचा चाहत्यांनी दिला सल्ला
भारती सिंगच्या या व्लॉगनंतर, तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली, तर अनेकांनी म्हटले की आता मुंबईत कोविडचे रुग्ण येत आहेत, त्यामुळे तिने तिची कोरोना चाचणी करून घ्यावी.

Web Title: Bharti Singh fell ill after returning from Bangkok, fever is coming, fans said - "Do a covid check..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.