दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:56 IST2025-11-04T12:54:29+5:302025-11-04T12:56:07+5:30
या अभिनेत्रीने संबंधित युवकाला ब्लॉक केले तरीही त्याने नवीन अकाऊंट बनवून आणि अभिनेत्रीला त्रास देणे सुरूच ठेवले.

दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात ग्लॅमरस व्यक्तींकडून त्यांचे फोटो, व्हिडिओ सातत्याने प्रोफाईलवर अपलोड केले जातात. फेसबुक, इन्स्टाग्राम यावर अज्ञात व्यक्तीही अभिनेत्रीला मेसेज पाठवू शकतात. अलीकडेच बंगळुरूमध्ये ४१ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीसोबत घडलेला प्रकार चर्चेत आला आहे. याठिकाणी सोशल मीडियावरून एकजण सातत्याने अभिनेत्रीला अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता.
या प्रकाराबाबत अभिनेत्रीने पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथे तक्रारीत तिने म्हटलं की, एका व्यक्तीला बऱ्याचदा ताकीद देऊनही सोशल मीडियाच्या माध्यमातून तो वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवत आहे. मागील ३ महिन्यापासून या भयंकर अनुभवातून ही तेलुगु आणि कन्नड टेलिव्हिजनची अभिनेत्री जात आहे. तिच्या फेसबुक प्रोफाईलवर Naveenz नावाच्या युजरकडून फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली. ही रिक्वेस्ट अभिनेत्रीने स्वीकारली नाही परंतु त्याने दररोज अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवणे सुरू केले.
प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ पाठवायचा...
या अभिनेत्रीने संबंधित युवकाला ब्लॉक केले तरीही त्याने नवीन अकाऊंट बनवून आणि अभिनेत्रीला त्रास देणे सुरूच ठेवले. या व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीवरून अश्लील मेसेज आणि प्रायव्हेट पार्टचे फोटो पाठवले. १ नोव्हेंबरला या व्यक्तीने जेव्हा मेसेज केला तेव्हा अभिनेत्रीने त्याला भेटायला बोलावले. हा आरोपी तिला भेटायला आला, तेव्हा अभिनेत्रीने हे चाळे थांबवण्यास सांगितले मात्र त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि वाद घालू लागला. हा वाद वाढल्यानंतर अभिनेत्रीने पोलिसांशी संपर्क साधत संबंधित प्रकारावर तक्रार दाखल केली.
या प्रकरणातील आरोपी Naveenz याला पोलिसांनी अटक करून ज्युडिशियल कस्टडीत पाठवले आहे. हा आरोपी बंगळुरूतील एका एजन्सीमध्ये डिलिवरी बॉय म्हणून काम करतो. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीवर कलम ७५(१)(३) लैंगिक छळ, कलम ७८(१)(२) पाठलाग करणे, कलम ७९ (विनयभंग करणे) यासारखे गुन्हे दाखल केले आहेत.