Aindrila Sharma : प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्माची मृत्यूशी झुंज अपयशी; 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:07 IST2022-11-20T14:48:38+5:302022-11-20T15:07:29+5:30
Aindrila Sharma : प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिचं निधन झालं आहे. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

Aindrila Sharma : प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्माची मृत्यूशी झुंज अपयशी; 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिचं निधन झालं आहे. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. एंड्रिलाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मल्टीपल कार्डियक अरेस्टनंतर एंड्रिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. कार्डियक अरेस्ट इतका गंभीर होता की तिला अनेक वेळा सीपीआर द्यावा लागला. मात्र आता तिचं निधन झालं आहे.
एंड्रिलाने याआधी दोनदा कॅन्सरशी सामना केला आणि तो लढा जिंकला होता. यानंतर आता तिच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब, मित्र-मैत्रिणी आणि चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. एंड्रिलाने दोन ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. 'झुमुर' या टीव्ही शोमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले.
अरिजीत सिंहने दिला मदतीचा हात
Jibon Jyoti, ‘Jiyon Kathi’ मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. एंड्रिलाने यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीवर शस्त्रक्रियाही करावी लागली. एंड्रिलाची प्रकृती गंभीर असल्याने ती मृत्यूशी झुंज देत होती. एंड्रिलाच्या हॉस्पिटलचा खर्चही हळूहळू वाढत होता आणि तो तब्बल 12 लाखांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबीयांनी कधीच कोणाकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली नाही.
एंड्रिलाच्या निधनाने सर्वांनाच धक्का
गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) याने एंड्रिला शर्मासाठी मदतीचा हात पुढे केला होता. एंड्रिला शर्माप्रमाणेच अरिजीत हा देखील पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा आहे आणि टीव्ही अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असल्याचं समजल्यावर त्याने हा पुढाकार घेतला होता. अरिजीतने तिला पुढील उपचारासाठी राज्याबाहेर नेले तर तो तिच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च उचलेल असं म्हटलं होतं. मात्र तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"