पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन रामपालचं 'या' अभिनेत्रीशी 'गॅटमॅट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 14:13 IST2018-06-04T14:13:23+5:302018-06-04T14:13:44+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल यानं 20 वर्षांनंतर स्वतःची पत्नी मेहर जेसिया हिच्याशी घटस्फोट घेतला.

arjun rampal bonds with natasa stankovic separation with mehr jesia | पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन रामपालचं 'या' अभिनेत्रीशी 'गॅटमॅट'

पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन रामपालचं 'या' अभिनेत्रीशी 'गॅटमॅट'

मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल यानं 20 वर्षांनंतर स्वतःची पत्नी मेहर जेसिया हिच्याशी घटस्फोट घेतला. दोघांनीही काडीमोड घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालने घर सोडलं असून, तो पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत असल्याचीही माहिती एका वेबसाइटनं दिली होती. त्यानंतर त्याच्या घटस्फोटाचीही बातमीही समोर आली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी अर्जुन रामपाल आणि हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझेन खान यांच्यात अफेअरची चर्चा रंगली होती. दोघांच्या वाढत्या जवळिकीमुळेच अर्जुन पत्नीपासून विभक्त झाल्याची चर्चा होती. परंतु आता अभिनेता अर्जुन रामपाल दुस-याच एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अर्जुन आणि मेहर यांच्या 20 वर्षांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी सुझेन नव्हे, तर मॉडल नताशा स्टेनकोविक कारणीभूत असल्याचं आता समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि नताशामध्ये जवळीक वाढत चालली आहे. नताशा बॉलिवूडमधल्या डीजे वाले बाबू गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

रिपोर्ट्सनुसार, नताशा स्टेनकोविक आणि अर्जुन रामपालची पहिली भेट सत्याग्रह चित्रपटाच्या सेटवर झाली होती. परंतु त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध डॅडी चित्रपटाच्या सेटवर झाले होते. त्यानंतर ते दोघे चांगले मित्र झाले. अर्जुन याच्या घटस्फोटाचं कारण नताशाच आहे, अशी आता चर्चा आहे. हल्लीच चित्रपट 'फुकरे रिटर्न्स' आणि 'मेहबूबा'च्या गाण्यात नताशा झळकली होती. अर्जुन आणि मेहरची 1998मध्ये लग्न झालं होतं. त्यांना दोन मुली असून, महिका आणि मायरा असं मुलींची नावे आहेत. 

Web Title: arjun rampal bonds with natasa stankovic separation with mehr jesia