अभिनेता अर्जुन बिजलानीवर कोसळला दु:खाचा डोंगर, सासरे राकेश स्वामी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:37 IST2026-01-01T17:36:29+5:302026-01-01T17:37:01+5:30
अर्जुनची पत्नी नेहा स्वामीचे ते वडील होते.

अभिनेता अर्जुन बिजलानीवर कोसळला दु:खाचा डोंगर, सासरे राकेश स्वामी यांचं निधन
टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या कुटुंबावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अर्जुनचे सासरे राकेश चंद्र स्वामी यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. अर्जुनची पत्नी नेहा स्वामीचे ते वडील होते. वडिलांच्या निधनाने नेहा पुरती कोसळली आहे. तर अर्जुन तिला धीर देत आहे. काही वेळापूर्वीच राकेश स्वामी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, अर्जुन आणि नेहाच्या कुटुंबातील सदस्य म्हणाले, "त्यांची तब्येत बरी होत होती. रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्यांना स्ट्रोक आला आणि त्यांना तातडीने बेलेव्हयू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी अर्जुन आणि नेहा मुंबईबाहेर होते. वडिलांची तब्येत बिघडल्याचं कळताच ते फ्लाईटने लगेच मुंबईत आले. जाण्याआधीच ते वडिलांना भेटून गेले होते. अचानक अशी बातमी मिळाल्याने त्यांनाही धक्का बसला. आम्ही सगळेच या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत."
अर्जुन आणि नेहाच्या टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकार मित्रांनीही अंत्यसंस्काराला हजेरी लावली. अर्जुन आणि नेहा लेकासोबत दुबईला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेले होते. अचानक नेहाचे वडील राकेश यांना आज आयसीयूत अॅडमिट करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात मुलगा निषांक आणि मुलगी नेहा आहेत.
नेहाने २०१३ साली अर्जुनसोबत लग्न केलं होतं. त्याआधी ती सुद्धा टीव्हीवर मालिकांमध्ये काम करत होती. लग्नानंतर अर्जुनही नेहाच्या वडिलांच्या जवळ होता. राकेश स्वामी यांच्या निधनाने नेहा प्रचंड धक्क्यात आहे. तर अर्जुन आणि त्यांचा मुलगा तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.