कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:01 PM2024-05-26T15:01:54+5:302024-05-26T15:02:26+5:30

काही दिवसांपूर्वीच अप्पी-अर्जुनचा मुलगा छोटा अमोल म्हणजेच सिम्बाची मालिकेत एन्ट्री झाली. त्यामुळे प्रेक्षकही आनंदी होते. पण, मालिकेतील बदलेल्या कथानकामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

appi amchi collector zee marathi serial gets troll for its track watch video | कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..."

कलेक्टरचं काम दाखवा! 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर चिडले प्रेक्षक; म्हणाले- "चांगली सिरीयल..."

छोट्या पडद्यावरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. एक वेगळा विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गावात राहणाऱ्या आणि साध्या घरात वाढलेल्या अपर्णाचा कलेक्टर होण्याचा प्रवास या मालिकेतून दाखविण्यात आला. याबरोबरच अप्पी-अर्जुनची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही दिवसांपूर्वीच अप्पी-अर्जुनचा मुलगा छोटा अमोल म्हणजेच सिम्बाची मालिकेत एन्ट्री झाली. त्यामुळे प्रेक्षकही आनंदी होते. पण, सध्या मात्र 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षक चिडले आहेत. 

'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. ७ वर्षांनंतर अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकमेकांसमोर येत असल्याचं दाखविण्यात आलं होतं. या मालिकेत छोट्या सिम्बाची एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पण, आता मात्र मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे. अप्पी आणि अर्जुनच्या घटस्फोटाचा ट्रॅक मालिकेत दाखविण्यात येत आहे. तसंच अर्जुनचा साखरपुडाही होत असल्याचं दाखवण्यात येणार आहे. मालिकेतील या बदलेल्या कथानकामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेचा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यावर कमेंट करत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

"फालतू करून टाकली सिरीयल...बापापासून मुलाला लांब करून काय दाखवायचा आहे यांना? त्या रुपालीला काढा सिरीयलमधून", "कलेक्टर पोस्टला काही महत्त्व आहे की नाही? काहीही दाखवता आहे तुम्ही", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

"कलेक्टर चे काम दाखवा फक्त शिवाजी चा पुतळा दाखविलं तर पुणे वाटेल काय?" अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. 

दरम्यान, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत आता अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल म्हणजेच छोटा सिम्बा त्यांना एकत्र आणणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता मालिका कोणतं वळण घेणार हे पाहणं औस्तुक्याचे ठरणार आहे. 
 

Web Title: appi amchi collector zee marathi serial gets troll for its track watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.