कधी कधी मला जगाला ओरडून सांगावसं वाटतं की..., विराटसाठी अनुष्का शर्माची ‘पॉवरफुल’ पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:42 IST2021-11-05T15:40:59+5:302021-11-05T15:42:10+5:30
Anushka Sharma Wishes Virat Kohli On His Birthday : फोटो खास आहेच. पण या फोटोसोबत अनुष्कानं विराटसाठी लिहिलेले शब्द त्याहीपेक्षा खास आहेत.

कधी कधी मला जगाला ओरडून सांगावसं वाटतं की..., विराटसाठी अनुष्का शर्माची ‘पॉवरफुल’ पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) पती विराट कोहली ( Virat Kohli) याचा आज (Virat Kohli Birthday) वाढदिवस. आता नवऱ्याचा वाढदिवस म्हटल्यावर बायको शुभेच्छा देणारच. अनुष्कानं विराटसाठी एक खास ‘पॉवरफुल’ पोस्ट लिहिली आहे. सोबत त्याच्यासोबतचा एक खास फोटोही शेअर केला आहे.
फोटोत अनुष्का व विराट दोघंही एकमेकांच्या मिठीत विसावलेले दिसत आहेत. फोटो खास आहेच. पण या फोटोसोबत अनुष्कानं विराटसाठी लिहिलेले शब्द त्याहीपेक्षा खास आहेत.
अनुष्का लिहिते,‘या फोटोसाठी आणि ज्या पद्धतीने तू जगतोस त्यासाठी फिल्टरची गरज नाही. तू प्रामाणिकपणा आणि शूर आहेस. धैर्य चिंता मिटवते. वाईट काळातून स्वत:ला बाहेर काढणारा तुझ्यासारखा वीर मी कुणी पाहिला नाही. तू कोणत्याही गोष्टीबद्दल मनात अढी ठेवत नाहीस आणि निर्भीडपणे प्रत्येक गोष्टीला सामोरा जातोय, म्हणूनच तू बेस्ट ठरतो. आपण असं सोशल मीडियावर एकमेकांबद्दल बोलणा-यांपैकी नाही, हे मला ठाऊक आहे. पण कधी कधी मला जगाला ओरडून सांगावसं वाटतं की, तू किती अद्भूत व्यक्ती आहेस. तुला ओळखणारे खरंच भाग्यवान आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रकाशमान आणि सुंदर बनवण्यासाठी तुझे आभार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा, क्यूटनेस....’
विराटनंही दिलं उत्तर...
बायकोच्या या लय भारी पोस्टवर विराटनंही सुंदर उत्तर दिलं आहे. ‘तू माझी ताकद आहेस. मला मार्ग दाखवणारी तू शक्ती आहेस. आपण दोघं सोबत आहोत, यासाठी मी रोज देवाचे आभार मानतो. आय लव्ह यू,’ असं त्यानं लिहिलं आहे.
अनुष्का व विराटनं 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये दोघांना मुलगी झाली.
टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि पाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर सडकून टीका झाली होती. ही टीका करताना काही विकृत चाहत्यांनी पातळी सोडून विराट कोहलीसोबत त्याच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर अनुष्काची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.