विराट-अनुष्काची लेक आता ५ वर्षांची! वामिकासाठी अभिनेत्रीची पोस्ट; वाचून तुम्हीही व्हाल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:01 IST2026-01-12T12:00:25+5:302026-01-12T12:01:34+5:30
अनुष्काने शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

विराट-अनुष्काची लेक आता ५ वर्षांची! वामिकासाठी अभिनेत्रीची पोस्ट; वाचून तुम्हीही व्हाल भावुक
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा क्रिकेटर विराट कोहली या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील पॉवर कपल्सपैकी एक असणाऱ्या विरुष्काचे फक्त देशातच नाहीतर, जगभरात चाहते आहेत. विराट आणि अनुष्काची लाडकी लेक वामिका आता पाच वर्षांची झाली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
काल ११ जानेवारी रोजी वामिकाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. या खास निमित्ताने अनुष्काने आपल्या इन्स्टाग्रामवर मातृत्वाचा प्रवास आणि मुलीबद्दलचे प्रेम व्यक्त करणारी एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये आई झाल्यानंतर एका स्त्रीचे आयुष्य कसे बदलते, यावर भाष्य केलेले आहे. अुष्कानं वामिकासाठी लिहलं, "तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तेव्हाची मी आता मला बनायचं नाही. ११ जानेवारी २०२१ हा तो दिवस आहे आणि ज्या दिवशी माझं आयुष्य खऱ्या अर्थानं पूर्ण झालं".

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर २०१७ मध्ये इटलीमध्ये त्यांनी शाही विवाह केला. ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी वामिकाचे ते आई-बाबा झाले. तर १५ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना 'अकाय' नावाचा मुलगा झाला. त्यांनी आतापर्यंत माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वामिकाचा चेहरा दाखवलेला नाही. त्यांनी पापाराझींना आपल्या मुलीचे फोटो क्लिक न करण्याची आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. २०२४ मध्ये अकाय कोहलीच्या जन्मानंतरही त्यांनी हेच केले.
अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. २०१८ मधील 'झिरो' हा तिचा शेवटचा मुख्य चित्रपट होता. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ती भारतीय माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारतेय. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असले तरी, त्याच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.