स्टँड-अप कॉमेडियन बस्सी बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? तिचा दोन वर्षांपूर्वीचं झालाय घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 15:37 IST2026-01-11T15:31:10+5:302026-01-11T15:37:20+5:30
लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.

स्टँड-अप कॉमेडियन बस्सी बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट? तिचा दोन वर्षांपूर्वीचं झालाय घटस्फोट
अनुभव सिंह बस्सी हा एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आहे. बस्सीचा शो म्हटल्यावर तो हाऊसफुल असणार, हे ठरलेलं समीकरण आहे. भारतासह विदेशातही त्याचे कॉमेडी शो झाले आहेत. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे त्यानं अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'तू झूठी मै मक्कार' सिनेमातून बॉलिवूडमध्येही डेब्यू केलाय. अनुभव सिंह बस्सीनं रणबीरच्या खास मित्राची भूमिका केली होती. आता अशातच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीला तो डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
तर ती आहे अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिला. बस्सी आणि कुशा यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात रंगल्या आहेत. बस्सीच्या वाढदिवसानिमित्त कुशाने शेअर केलेल्या एका लांबलचक आणि भावुक पोस्टमुळे या दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना नव्याने तोंड फुटले आहे.
कुशाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बस्सीचे सनग्लासेस घालून त्याच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिनं लिहलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बस्सी! तू खूप दयाळू आहेस. जेव्हा बाकी सगळे घाबरलेले असतात, तेव्हा तू सर्वात शांत असतोस. तू नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त मदतीचा हात पुढे करतोस. तू अशा प्रकारे पार्टी करतोस जणू तुझं वय उलटं फिरतंय".
कुशाने बस्सीच्या स्वभावाचे कौतुक करताना पुढे म्हटले, "तू कोणालाही कधीच एकटं सोडत नाहीस आणि प्रत्येकजण मजा करेल याची काळजी घेतोस. तरीही तू प्रत्येक फ्लाईट वेळेवर पकडतोस. संधी मिळाली तर तू कविताही लिहितोस. तू इतकी योजना आखतोस की गोंधळही तुला विचलित करू शकत नाही. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू खूपच मजेदार आहेस".
कुशाने या पोस्टमध्ये बस्सीचे इतके कौतुक केल्यानं हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. "ही केवळ मैत्री नाही" अशा कमेंट्स अनेक युजर्सनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, कुशाने २०२३ मध्ये जोरावर सिंह अहलुवालियापासून घटस्फोट घेतलेला आहे. दरम्यान, या अफवांवर बस्सी किंवा कुशा या दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.