शुभ मंगल सावधान! अंकिता लोखंडे या तारखेला अडकणार विकी जैनसोबत लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 14:12 IST2021-11-01T14:12:34+5:302021-11-01T14:12:56+5:30
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

शुभ मंगल सावधान! अंकिता लोखंडे या तारखेला अडकणार विकी जैनसोबत लग्नबेडीत
टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी तिच्या रिलेशनशीपमुळे. दरम्यान आता असे समजते आहे की,अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेण्ड विक्की जैनसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून अंकिता विक्की जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली जाहीरपणे दिली आहे. यातच आता अंकिता लोखंंडे आणि विक्की जैन लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ईटाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार अंकिता आणि विक्कीने लग्नासाठी तारीख फायनल करायला सुरुवात केली आहे. १२, १३ आणि १४ डिसेंबरला दोघे लग्नबेडीत अडकू शकतात. दोघांनी निकटवर्तीयांना निमंत्रण पत्रिका पाठवल्याचे देखील समजते आहे.
अंकिता आणि विक्की साडे तीन वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. नुकताच त्या दोघांंचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अंकिता आणि विक्की भर पार्टीत एकमेकांना किस करताना दिसून आले. विक्की जैनआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत रिलेशलशीपमध्ये होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले होते.