मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची अनिता दाते, म्हणाली "आम्ही तर महात्मा गांधींना बोलावलं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:21 IST2025-06-04T15:13:43+5:302025-06-04T15:21:31+5:30

नुकतंच एका मुलाखतीमध्ये अनिता दातेनं धक्कादायक खुलासा केलाय. 

Anita Date Used To Play Planchet With Her Friends, Said We Invited Mahatma Gandhi| Jarann Marathi Movie | मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची अनिता दाते, म्हणाली "आम्ही तर महात्मा गांधींना बोलावलं आणि..."

मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची अनिता दाते, म्हणाली "आम्ही तर महात्मा गांधींना बोलावलं आणि..."

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं, टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल होती. अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिला 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. अनिता दातेने साकारलेली राधिकाची भूमिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. सध्या ती आगामी 'जारण' सिनेमामुळे चर्चेत आहे. काळ्या जादूवर आधारित या सिनेमात तिची महत्वाची भूमिका आहे. टेलिव्हिजन ते मोठा पडदा असा प्रवास राहिला आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये अनिता दातेनं ती मैत्रिणींसोबत मिळून 'प्लँचेट' खेळायची असा धक्कादायक खुलासा केलाय. 

अनिता दातेनं अलिकडेच 'जारण' चित्रपटातील सहकलाकार अमृता सुभाषसोबत 'अल्ट्रा मराठी बझ' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी दोघांनीही 'जारण' सिनेमात काम करतानाचे अनुभव सांगितले. या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की काळी जादूवर विश्वास आहे का आणि प्लँचेट कधी खेळलं आहे का?. यावर अनिता उत्तर देत म्हणाली, "हो मी केलं आहे. लहानपणी गल्लीतील  मित्रमैत्रिणींनी मिळून प्लँचेट केलेलं आहे. आम्ही असं पाटावर ते करायचो. आम्ही तर अगदी महात्मा गांधींनादेखील बोलावलं होतं", असं हसत तिनं सांगितलं. 

'जारण' सिनेमासाठी अनिता दाते आणि अमृता सुभाष यांनी एकत्र काम केलं असून, या सिनेमात दोघींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.  हा चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया २’, ‘भुलभुलैया ३’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर पाहून सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता चाहते हा 'जारण' सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
 

Web Title: Anita Date Used To Play Planchet With Her Friends, Said We Invited Mahatma Gandhi| Jarann Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.