Video : अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे एन्गेज्ड; बॉयफ्रेन्डनं फिल्मी स्टाईलनं केलं प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 14:30 IST2021-11-06T14:26:45+5:302021-11-06T14:30:13+5:30
होय, अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे (Alanna Panday) हिचा साखरपुडा झाला असून लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे.

Video : अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे एन्गेज्ड; बॉयफ्रेन्डनं फिल्मी स्टाईलनं केलं प्रपोज
चंकी पांडेची (Ananya Panday ) लाडकी लेक अनन्या पांडे आता एक बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून अनन्याचा डेब्यू झाला आणि अनन्या सर्वांच्या नजरेत भरली. पण तूर्तास आम्ही अनन्या पांडेबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. होय, अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे (Alanna Panday) हिचा साखरपुडा झाला असून लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे.
खुद्द अलानाने इन्स्टाग्रामवर याचा खुलासा केला आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत अलानाचा बॉयफ्रेन्ड Ivor McCray V तिला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज करताना दिसतोय.
समुद्रकिना-यावरच्या वाळूत एक हार्टशेप आकृती आहे. त्याच्या चहूबाजूंनी लॅम्प आहेत आणि आत अलानाचा बॉयफ्रेन्ड तिला लग्नाची मागणी घालतोय. त्याच्या वर ‘मॅरी मी’ असं लिहिलेलं दिसतंय. साखरपुड्यानंतरचे काही फोटोही अलानाने शेअर केले आहेत. लवकरच लग्न करतेय, असं कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे.
तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अलानाची आई डियाने आणि काकू भावना पांडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अलाना व आइवर यांची पहिली भेट दोन वर्षांपूर्वी एका हैलोवीन पार्टीत झाली होती. त्यारात्री त्याने अलानाला इतकं हसवलं की, हसून हसून तिचं पोट दुखलं होतं. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि 3 महिने एकमेकांना ओळखल्यानंतर दोघही एकत्र राहू लागले आणि आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी आहे. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या अलानाचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत.
बॉलिवूडमध्ये नसली तरी अलाना ग्लॅमर वर्ल्डचा भाग आहे. शाहरूखची मुलगी सुहाना खान हिच्याशी तिची घट्ट मैत्री आहे. संवेदनशील स्वभावाच्या अलानाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि झोपणं प्रचंड आवडतं. अनेकदा ती 14-14 तास झोपते.