अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...

By मोरेश्वर येरम | Updated: January 7, 2021 13:44 IST2021-01-07T13:41:14+5:302021-01-07T13:44:10+5:30

''डाव मांडते भीती'', असे गाण्याचं शिर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या आहेत.

amruta fadnavis new song arrived | अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...

अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...

ठळक मुद्देअमृता फडणवीसांचं अखेर नवं गाण आलं'अंधार' चित्रपटातील 'डाव मांडते भीती' गाणं प्रदर्शितअमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नव्या गाण्याची लिंक ट्विट केली

मुंबई
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. 
'झी म्यूझिक मराठी'च्या आगामी 'अंधार' या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ''डाव मांडते भीती'', असे गाण्याचं शिर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या आहेत. अमृता फडणवीस देखील या गाण्याच्या व्हिडिओत दिसून येत आहेत. 

Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नव्या गाण्याची लिंक ट्विट केली आहे. 

'अंधार' या चित्रपटात अभिनेत्री सागरिका घाटगे आणि अभिनेता गुलशन देवये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अमृता फडणवीस यांनी गायलेले ''डाव मांडते भीती'' हे गाणं जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलं आहे. 

'ट्रोलर्स'चं केलं होतं स्वागत
अमृता फडणवीस याआधी त्यांच्या 'तिला जगू द्या', या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्यावर अमृता फडणवीसांनी "मी नेहमी ट्रोलर्सचं स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणं थांबवणार नाही. माझं आणखी एक गाणं लवकरच येणार आहे", असं म्हटलं होतं. 
 

Web Title: amruta fadnavis new song arrived