अक्षय खन्नाचा 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्स, 'या' अभिनेत्रीसोबत केलेला परफॉर्म; जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:26 IST2026-01-31T18:26:14+5:302026-01-31T18:26:42+5:30

अक्षय खन्नाचा व्हिडीओ पाहिलात का?

akshaye khanna s old video on chhaiyaa chhaiytaa song viral on reddit | अक्षय खन्नाचा 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्स, 'या' अभिनेत्रीसोबत केलेला परफॉर्म; जुना व्हिडीओ व्हायरल

अक्षय खन्नाचा 'छैय्या छैय्या' गाण्यावर डान्स, 'या' अभिनेत्रीसोबत केलेला परफॉर्म; जुना व्हिडीओ व्हायरल

अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही वर्षात अचानक प्रसिद्धीझोतात आला आहे. 'धुरंधर' सिनेमामुळे आणि यशामुळे आता त्याच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या आहेत. त्याचे जुने व्हिडीओही व्हायरल होत असून चाहते पुन्हा त्याच्या प्रेमातच पडले आहेत. अक्षयने आजवर अनेक सिनेमे केले ज्याची आज वाहवाही होत आहे. आता अक्षयचा रेडिटवर डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचं डान्सिंग टॅलेंट पाहूनही लोक कौतुक करत आहेत.

अक्षय खन्नाचा हा व्हिडीओ रेडिट या सोशल मीडियावर साईटवरुन व्हायरल होत आहे. हा एक अवॉर्ड इव्हेंटच्या वेळचा व्हिडीओ दिसत आहे. यामध्ये अक्षय आणि ट्विंकल खन्ना शाहरुख खानच्या 'छैय्या छैय्या' गाण्यावर परफॉर्म करत आहेत. अक्षयच्या डान्स स्टेप्स पाहून प्रेक्षक वेडेच झालेत.

Rare video of Akshaye Khanna dancing on Chaiyya Chaiyaa and Aamir Khan on Salman's songs at an event in 2000:
byu/GiveMeSomeSunshine3 inBollyBlindsNGossip

'हा इतका परफेक्ट कसा' असा प्रश्न चाहते विचारत आहेत. मुली तर त्याचा व्हिडीओ पाहून त्यांची नजरही हटवू शकत नाहीयेत. अक्षय खन्ना हे नाव आता बीटाऊनमध्ये राज्य करत असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे स्वत: अक्षय खन्ना मात्र एक सुपरहिट सिनेमा देऊन गायब होतो. पुन्हा त्याचा कडक परफॉर्मन्स असलेला सिनेमा येतो आणि तो पुन्हा गायब होतो. अक्षय खन्नाने 'धुरंधर'च्या यशानंतरही एकही मुलाखत दिलेली नाही. त्याच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title : ट्विंकल खन्ना के साथ अक्षय खन्ना का 'छैय्या छैय्या' डांस वायरल।

Web Summary : अक्षय खन्ना का ट्विंकल खन्ना के साथ 'छैय्या छैय्या' पर पुराना डांस वीडियो वायरल हो रहा है। प्रशंसक उनकी प्रतिभा और करिश्मा की प्रशंसा कर रहे हैं, और हाल की सफलता के बाद अभिनेता के प्रति अपने प्यार को फिर से खोज रहे हैं। रुचि नवीनीकृत होने के बावजूद, खन्ना साक्षात्कार से बचते हुए मायावी बने हुए हैं।

Web Title : Akshaye Khanna's 'Chaiyya Chaiyya' dance with Twinkle Khanna goes viral.

Web Summary : Akshaye Khanna's old dance video with Twinkle Khanna on 'Chaiyya Chaiyya' is trending. Fans are praising his talent and charisma, rediscovering their love for the actor after his recent success. Despite the renewed interest, Khanna remains elusive, avoiding interviews.