जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय, सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:56 IST2018-08-24T01:50:57+5:302018-08-24T06:56:26+5:30

जगात सर्वाधिक कमाई करणाºया टॉप-१0 अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि सलमान खान यांना स्थान मिळाले आहे.

Akshay, Salman Khan among the world's highest-paid actors | जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय, सलमान खान

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय, सलमान खान

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-१0 अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि सलमान खान यांना स्थान मिळाले आहे. फोर्ब्स या नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत अक्षयकुमार सातव्या, तर सलमान खान नवव्या स्थानी आहे. या यादीत नेहमी स्थान मिळविणारा शाहरुख खान मात्र यंदा बाहेर फेकला गेला आहे.

फोर्ब्सने १ जून २0१७ ते १ जून २0१८ या काळातील अभिनेत्यांनी केलेल्या एकूण कमाईच्या आधारे ही यादी तयार केली आहे. जगातील टॉप-१0 अभिनेत्यांची एकत्र कमाई ७४८.५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. अभिनेता अक्षयकुमारची कमाई ४0.५ दशलक्ष डॉलर, तर सलमान खानची कमाई ३८.५ दशलक्ष डॉलर आहे. गेल्या महिन्यात जारी झालेल्या जगातील सर्वाधिक मानधन घेणाºया १00 अभिनेत्यांतही अक्षयकुमार आणि सलमान खान या दोघांनी स्थान मिळविले होते. यात अक्षयकुमार ७६ व्या स्थानी होता तर सलमान खानचे स्थान ८२ वे होते. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांची नावे या यादीतही नव्हती.

अभिनेत्यांच्या या यादीत हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी सर्वोच्च स्थानी आहे. डॉनी जॉन्सन, जॅकी चॅन, रॉबर्ट डॉनी ज्युनिअर, ख्रिस हेम्सवर्थ आणि ख्रिस इॅव्हॅन्स यांचा यादीत समावेश आहे.

 

Web Title: Akshay, Salman Khan among the world's highest-paid actors