अक्षय कुमार तिकीट खिडकीवर ठरला विराट

By Admin | Updated: February 22, 2017 19:12 IST2017-02-22T18:53:59+5:302017-02-22T19:12:16+5:30

विराट कोहली जसं मैदानावर धावांचा रतीब लावत आहे तसेच खिलाडी अक्षय कुमार तिकीटखिडकीवर यशस्वी होतं आहे.

Akshay Kumar's ticket was on the verge of Virat | अक्षय कुमार तिकीट खिडकीवर ठरला विराट

अक्षय कुमार तिकीट खिडकीवर ठरला विराट

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - विराट कोहली जसं मैदानावर धावांचा रतीब लावत आहे तसेच खिलाडी अक्षय कुमार तिकीट खिडकीवर यशस्वी होतं आहे. विराट कोहलीने चार द्विशतके करत नवा रेकॉर्ड केला आहे. तसेच अक्षय कुमारने सलग चार चित्रपटात 100 कोटींचा व्यवसाय करत चांगलीच बॅटींग केली म्हणावे लागेल. 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला जॉली एलएलबी -2 ने 12 व्या दिवशी 100 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

100 कोटी क्लबमध्ये दाखल होणारा जॉली एलएलबी -2 हा अक्षय कुमारचा सलग चौथा आणि एकूण सातवा चित्रपट आहे. गेल्यावर्षी खिलाडी अक्षयने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले होते. 2016मध्ये प्रदर्शित झालेले एअरलिफ्ट, रुस्तम आणि हाऊसफुल ३ या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. 
('जॉली एलएलबी'चा येणार तिसरा सिक्वेल)
 
जॉली एलएलबी -2या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. तसेच अक्षय कुमार, हुमा कुरेशी, सयानी गुप्ता, अन्नू कपूर, कुमुद मिश्रा आणि सौरभ शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत. 2013 मध्ये आलेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.
 
(OMG ! २०१७मध्ये खिलाडी अक्षयचे ७ चित्रपट ?)

दरम्यान, जॉली एलएलबी -2 या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तिसरा सिक्वल येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जॉली एलएलबी -3 निश्चितपणे होणार असून आम्ही या तिस-या सिक्वेलसाठी आत्तापासूनच कामाला लागलो आहोत. तसेच, याबाबत आमच्याकडे दोन-तीन चांगल्या कल्पना असल्याचे फॉक्स स्टार स्टुडिओचे सीईओ आणि निर्माते विजय सिंह यांनी सांगितले.

(खिलाडी हिट है! सलमान-करणच्या सिनेमात अक्षय कुमार हिरो)

Web Title: Akshay Kumar's ticket was on the verge of Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.