Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:31 IST2025-09-20T13:31:32+5:302025-09-20T13:31:59+5:30

Akshay Kumar : अक्षय "आप की अदालत" या शोमध्ये दिसला. याच दरम्यान त्याने त्याच्या पर्सनल आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या.

Akshay Kumar failed in 7th class fans laugh video viral | Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा "जॉली एलएलबी ३" हा चित्रपट रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी कशी असेल हे येत्या काही दिवसांत कळेल, पण काही दिवसांपूर्वी अक्षय "आप की अदालत" या शोमध्ये दिसला. याच दरम्यान त्याने त्याच्या पर्सनल आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या. त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अक्षयने सातवीत नापास झाल्याचं म्हटलं आहे.

अक्षयने हे सांगताच प्रेक्षक आधी हसले, नंतर ओरडायला लागले. यावर अक्षय म्हणाला, "तुम्ही लोक इतके का शॉक्ड झाला आहात? हे खरं आहे. अभिनेत्याने एक सीरियस मोमंट आपल्या विनोदी पद्धतीने हाताळली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. शोमध्ये अक्षयला तो त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला घाबरतो का? असा प्रश्नही विचारण्यात आला. 

अक्षयला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. "एकदा माझ्या वडिलांनी मला विचारलं की तुला काय व्हायचं आहे? आणि मी त्यांना लगेच सांगितलं की मला अभिनेता व्हायचं आहे. माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं" असं अक्षयने म्हटलं आहे. अक्षय कुमारचा "जॉली एलएलबी ३" हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 

सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबत अर्शद वारसी आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. अक्षय आणि अर्शद त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी "बिग बॉस १९" या रिअॅलिटी शोमध्ये दिसले. त्यांनी घरातील सदस्यांसोबत खूप मजा केली. अक्षयने चाहत्यांचं एकट्याने खूप मनोरंजन केलं. प्रेक्षकांना अक्षयची कॉमेडी खूप आवडली आणि "बिग बॉस १९" टीआरपी चार्टवर टॉप १० मध्ये पोहोचला.

Web Title: Akshay Kumar failed in 7th class fans laugh video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.