घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा एकत्र येणार? जाणून घ्या यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:45 PM2023-10-14T13:45:41+5:302023-10-14T13:51:12+5:30

ॉमागच्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळं झालेलं हे कपल पुन्हा एकत्र येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात होती.

Aishwarya rajinikanth and dhanush patch up news they are not getting back again | घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा एकत्र येणार? जाणून घ्या यामागचं सत्य

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा एकत्र येणार? जाणून घ्या यामागचं सत्य

साउथचा अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने १८ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुषने त्याचे वैवाहिक नाते संपुष्टात आल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली. धनुषने १८ नोव्हेंबर २००४ रोजी सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले. विभक्त झाल्यानंतर, हे कपल मोठ्या मुलाच्या  शाळेच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. मागच्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळं झालेलं हे कपल पुन्हा एकत्र येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात होती.

मागील रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की धनुष आणि ऐश्वर्या त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देऊ इच्छित आहेत. मात्र लेटेस्ट रिपोर्टनुसार यात काही तथ्य नाही. दोघं पुन्हा एकत्र येण्याच्या विचारत नाहीत.दोघं मिळून फक्त त्यांच्या मुलांचं पालकत्व निभावत आहेत.


दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी १८ नोव्हेंबर, २००४ साली लग्न केले. आता धनुष आणि ऐश्वर्याने लग्नाच्या १८ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुले आहेत. जानेवारी २०२२ मध्ये, ऐश्वर्या आणि धनुष यांनी आपापल्या इन्स्टाग्राम पेजवर वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला. अलीकडेच त्यांच्या पॅच अपच्या बातम्या आल्या. मीडिया रिपोर्टनुसार, 'धनुष ऐश्वर्यासोबतचे त्याचे मतभेद दूर करत नाहीये. ते वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या मार्गाने पुढे गेले आहेत. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या रजनीकांत तिच्या 'लाल सलाम' या दिग्दर्शित चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शन कामात व्यस्त आहे. विक्रांत आणि विष्णू विशाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील तर रजनीकांत यांचाही कॅमिओ असेल. शूटिंग पूर्ण झाले असून हा चित्रपट पोंगल 2024 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


 

Web Title: Aishwarya rajinikanth and dhanush patch up news they are not getting back again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.