प्राची पिसाट प्रकरणानंतर ट्रोलिंगला कंटाळून सुदेश म्हशिलकर यांनी उचललं मोठं पाऊल, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:13 IST2025-05-28T14:08:05+5:302025-05-28T14:13:56+5:30

प्राची पिसाट प्रकरणामुळे सुदेश म्हशिलकर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. यामुळे सुदेश यांनी मोठं पाऊल उचललं आहे. वाचा सविस्तर

after prachi pisat controversy Sudesh Mhashilkar take big decision delete instagram post | प्राची पिसाट प्रकरणानंतर ट्रोलिंगला कंटाळून सुदेश म्हशिलकर यांनी उचललं मोठं पाऊल, वाचून व्हाल हैराण

प्राची पिसाट प्रकरणानंतर ट्रोलिंगला कंटाळून सुदेश म्हशिलकर यांनी उचललं मोठं पाऊल, वाचून व्हाल हैराण

अभिनेते सुदेश म्हशिलकर (sudesh mhashilkar) यांच्या चॅटिंगचे स्क्रीशॉट अभिनेत्री प्राची पिसाटने व्हायरल केले. "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये", असे मेसेज केल्याने प्राचीने सुदेश यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे सुदेश म्हशिलकर यांच्याविरोधात तीव्र नाराजीचे सुर उमटले. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्राचीची (prachi pisat) बाजू घेत सुदेश यांच्यावर टीका केली. अशातच ट्रोलिंगला कंटाळून सुदेश म्हशिलकर यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय.

सुदेश म्हशिलकर यांनी ट्रोलिंगला कंटाळून घेतला निर्णय

सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाट प्रकरणामुळे प्रचंट ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओवर वाईट कमेंट करताना दिसले. त्यामुळेच सुदेश म्हशिलकर यांनी इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या सर्व पोस्ट आणि रील व्हिडीओ डीलिट केले आहेत. सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आता एकही पोस्ट दिसत नाहीय. काल-परवा पर्यंत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचे फोटो आणि रील्स दिसत होते. परंतु आता त्यांनी सर्व पोस्ट हटवल्या आहेत. इतकंच नव्हे, सुदेश यांनी त्यांचं फेसबुक अकाउंट प्रायव्हेट केलं आहे.

सुदेश यांचे मेसेज काय होते?

प्राची पिसाट प्रकरणामुळे सुदेश यांनी हा मोठा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे. प्राची वारंवार सोशल मीडियावर सुदेश यांच्याविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. त्यामुळे अनेक लोकांनी सुदेश यांना सोशल मीडियावर ट्रोल करुन त्यांच्या प्रत्येक पोस्टखाली टीका केली आहे. २५ मे रोजी प्राचीने सोशल मीडियावर सुदेश यांचे मेसेज शेअर केले होते. यात सुदेश म्हशिलकर यांनी अभिनेत्रीला "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये...कसली गोड दिसतेस", असा मेसेज केला होता. तर दुसऱ्या मेसेजमध्ये "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असं सुदेश यांनी म्हटलं होतं. 


सुदेश यांचं अकाउंट हॅक?

सुदेश म्हशिलकर यांचं अकाउंट हॅक झाल्याने त्यांच्याकडून प्राची पिसाटला असे मेसेज गेले का, अशीची चर्चा सुरु होती. याविषयी प्राचीने खुलासा केला की, "मी माझ्या बाजूने सायबर क्राइम अधिकाऱ्यांना विनंती करुन आधीच चेक आणि कन्फर्म केलं आहे की, त्यांचं अकाउंट खरंच हॅक झालं आहे की नाही? त्यावेळी सायबर क्राइम टीमने सांगितलं की, एप्रिल पासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं." 

तीन दिवस उलटून गेले तरीही सुदेश यांनी या प्रकरणावर त्यांची बाजू मांडली नाही. अशातच आता सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डीलिट केल्याने या संपूर्ण प्रकरणात सुदेश काय भूमिका घेणार, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

Web Title: after prachi pisat controversy Sudesh Mhashilkar take big decision delete instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.