'मग मी IPL ला जाऊ शकेन...;' आता राखीला करायचंय क्रिकेटरशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:08 IST2022-02-20T10:05:11+5:302022-02-20T10:08:57+5:30

व्हॅलेंटाइन डेच्या अगोदर राखी सावंत आणि रितेश वेगळे झाल्याचं समोर आलं. राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत याची माहिती दिली होती.

after her husband ritesh news Now Rakhi sawant wants to marry a cricketer said will go to cheer ipl on stadium | 'मग मी IPL ला जाऊ शकेन...;' आता राखीला करायचंय क्रिकेटरशी लग्न

'मग मी IPL ला जाऊ शकेन...;' आता राखीला करायचंय क्रिकेटरशी लग्न

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. बिग बॉसच्या १५व्या पर्वात तिने पती रितेशची ओळख करून दिली होती. या पर्वात राखी सावंतनं वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर अनेकदा दोघंही एकत्र दिसले. 

पण, व्हॅलेंटाइन डेच्या अगोदर दोघंही वेगळे झाल्याचं समोर आलं. राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत याची माहिती दिली होती. राखी म्हणाली, ‘मी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याशी लग्न करावं असं माझ्या वडिलांना वाटत होतं. मात्र, एका क्रिकेटरशी माझं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. मग मीदेखील आयपीएलला जाऊ शकेन. स्टेडियममधून आपल्या पतीला चौकार-षटकार मारताना पाहू शकेन. त्याला सपोर्ट करेन’ 


यासोबतच राखीनं तिचा पती अनेक कायदेशीर बाबींमध्ये फसलेला असल्यानं आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला हे या मुलाखतीत स्पष्ट केलं.

Web Title: after her husband ritesh news Now Rakhi sawant wants to marry a cricketer said will go to cheer ipl on stadium