हा अभिनेता १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर करणार पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 17:17 IST2017-10-17T11:47:27+5:302017-10-17T17:17:27+5:30
.jpg)
हा अभिनेता १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर करणार पुनरागमन
ग विंद नामदेव यांनी सरफरोश, विरासत यांसारख्या अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळात अण्णा-किसान बाबूराव हजारे, रईस, जेडे हे हिंदी चित्रपट तर सोलार एक्लिप्स हा हॉलिवुडचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांमध्ये व्यग्र असूनही ते आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. गोविंद नामदेव यांनी आशीर्वाद या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. एवढेच नव्हे तर तर त्यांनी डिटेक्टिव्ह ब्योंकेश बक्षी आणि परिर्वतन यांसारख्या मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून ते छोट्या पडद्यावरून गायब आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण गोविंद नामदेव यांनी गेल्या १७ वर्षांत कोणत्याही मालिकेत काम केले नाही. मालिकेत अनेक वर्षं काम न करण्यामागे एक खास कारण असल्याचे गोविंद नामदेव यांनी सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. गोविंद नामदेव यांनी सांगितले होते की, मी मालिकेत काम करत असल्याने चित्रपटांना देण्यासाठी माझ्याकडे तारखा नसायच्या. त्यामुळे मी केवळ मालिकांमध्ये काम करण्यास उत्सुक आहोत असे सगळ्यांना वाटत होते. त्यामुळे मालिकांपेक्षा चित्रपटात अधिक काम करायचे असे मी ठरवले. खरे तर प्रेमग्रंथ हा चित्रपट माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाच्या प्रिमियरनंतर केवळ एक-दोन आठवड्यात मी चार चित्रपट साईन केले होते. चित्रपटात व्यग्र असल्याने मी मालिकांपासून दूर राहिलो.
![govind namdev]()
आता गोविंद नामदेव खून किसने किया या मालिकेत दिसणार आहेत. स्टार भारत या वाहिनीवर प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार असून या मालिकेच्या चित्रीकरणाला देखील त्यांनी सुरुवात केली आहे, या मालिकेत त्यांच्यासोबत फहाद अली आणि राम यशवर्धन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत ते प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
गोविंद नामदेव यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. रंगभूमीवर त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.
Also Read : हम अब सिखायेंगे - गोविंद नामदेव